'बजरंग' बली की जय! इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत उपांत्यफेरीत

भारताचा पैलवान बजरंग पूनियानं क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मानच दाखवले आहे.
'बजरंग' बली की जय! इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत उपांत्यफेरीत
'बजरंग' बली की जय! इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत उपांत्यफेरीतSaam Tv

Tokyo Olympics 2020 : भारताचा India पैलवान बजरंग पूनियानं Bajrang Punia क्वार्टर फायनल Final मध्ये जबरदस्त डाव टाकत इराणच्या पैलवानाला अक्षरशा आस्मानच दाखवले आहे. प्री क्वार्टर मध्ये अटी- तटीच्या या सामन्यामध्ये रोमांचक विजय मिळवल्यावर बजरंगने क्वार्टर फायनल मध्ये समोरच्या पैलवानाला लोळवत सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. बजरंग हा पदकापासून केवळ एक पाऊल दूर राहिला आहे.

बजरंग पूनियानं एकाच मूव्ह मध्ये विरोधी पैलवानाला चित- पट केले आहे. इराणच्या मुर्तजाला हरवून, तो सेमीफायनल Semifinals मध्ये पोहोचलेला आहे. आज त्याचा सेमीफायनलचा सामना होणार आहे. टोकियो Tokyo ऑलिम्पिक मध्ये सुरुवातीपासूनच बजरंग पूनिया याला पदकाचा दावेदार मानला जात आहे. बजरंग पूनियाकडे भारताला कुस्तीतले पहिले सुवर्णपदक जिंकण्याची संधी मिळाली आहे.

हे देखील पहा-

बजरंगने प्री क्वार्टर फायनल मध्ये किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवेला हरवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. या प्री क्वार्टर फायनल सामन्यात मध्ये विजय मिळवत बजरंग क्वार्टर फायनल मध्ये झेप घेतला आहे. किर्गिस्तानच्या एर्नाजर अकमातालिवे विरुद्धचा हा सामना फारच रोमांचक झाला आहे. या कुस्तीमध्ये दोघांनी ३- ३ अशी बरोबरी केली होती. मात्र, त्याअगोदर बजरंग पूनियानं २ प्वाईंट घेतले होते.

यामुळे त्याला विजयी घोषित करण्यात आले आहे. भारताची कुस्तीपटू सीमा बिसलाचं टोकियो ऑलिम्पिक मधील आव्हान संपुष्टात आले आहे. प्री क्वार्टर फायनल मध्ये हरल्यानंतर देखील सीमा बिसला कांस्य पदकाच्या शर्यतीमध्ये राहणार होती. मात्र, ज्या रेसलरने सीमाला हरवले होते. ती रेसलर फायनलपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यामुळे सीमा बिसलाचे आव्हान देखील संपुष्टात आले आहे.

'बजरंग' बली की जय! इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत उपांत्यफेरीत
Tokyo Olympics: हॉकीत भारताच्या लेकी हरल्या पण सर्वांची मनं जिंकली

कुस्तीमध्ये आता बजरंग कडूनच पदकाची अपेक्षा भारताला राहिली आहे. भारतीय महिला हॉकी संघाचा ग्रेट ब्रिटनकडून ४- ३ असा पराभव झाला आहे. इतिहास रचण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय महिला टीमने कांस्य पदकासाठी या लढतीमध्ये शानदार कामगिरी केली आहे. मात्र, एका गोलच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरले आहे. आज महिला संघाकडून महिला हॉकी मधील पहिल्या पदकाची अपेक्षा होती. भारताच्या लेकींनी या सामन्यात यासाठी पुरेपूर प्रयत्न केले आहे,मात्र ते अपुरे पडले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com