श्रीलंकेचा संपूर्ण संघ कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत; SLC आणि BCCI चिंतेत

पाकिस्तान सोबतच्या मालिके अगोदर इंग्लंडचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर इंग्लंडच्या 9 अनकॅप खेळाडूंना संघात सामिल करुण घेतले आहे.
श्रीलंकेचा संपूर्ण संघ कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत; SLC आणि BCCI चिंतेत
श्रीलंकेचा संपूर्ण संघ कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत; SLC आणि BCCI चिंतेतTwitter/ @OfficialSLC

INDvsENG: श्रिलंकेचा संघ नुकताच इंग्लंडचा दौरा संपवून मायादेशी परतला आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंची कोरोनाची चाचणी (COVID-19 Report) केली असून खेळाडू विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि श्रीलंका क्रिकेट (SLC) यांना कोरोना अहवालाची प्रतिक्षा आहे. मंगळवारी इंग्लंड संघाच्या 7 सदस्यांसह तीन खेळाडूंचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ब्रिस्टलमध्ये परेरा आणि कंपनी बऱ्याच लोकांच्या संर्पकात होती त्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह येण्याची शक्यता आहे. 13 जुलैपासून श्रीलंकेचा सामना शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाशी (Team India) होणार आहे. त्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत.

पाकिस्तान सोबतच्या मालिके अगोदर इंग्लंडचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर इंग्लंडच्या 9 अनकॅप खेळाडूंना संघात सामिल करुण घेतले आहे. श्रीलंकेतही अशीच परिस्थिती उद्भवू शकते. सध्या, सर्व खेळाडू आणि कर्मचारी सदस्यांची कोविड चाचणी घेण्यात आली असून त्याचा निकाल बुधवारी येणं अपेक्षित आहे.

श्रीलंकेचा संपूर्ण संघ कोरोना अहवालाच्या प्रतिक्षेत; SLC आणि BCCI चिंतेत
दोन नविन संघांबरोबरच IPL 2022 च्या फॉरमॅट मध्ये होणार बदल

श्रीलंकेचे प्रशिक्षक मिकी आर्थरने माध्यामांशी बोलताना म्हणाले, “आम्ही कोलंबोमध्ये पोहोचलो आणि रॅपिड अँटीजेन चाचणी करुणच आमच्या खोल्यांमध्ये प्रवेश केला. चाचणी केल्याशिवाय आम्हाला रुममध्ये जाण्याची परवानगी नव्हती. आमच्या सर्व खेळाडू आणि सदस्यांची चाचणी झालेली आहे. त्याचे निकाल बुधवारी समोर येतील. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे खेळाडू आणि श्रीलंकेचे खेळाडू बराच वेळ एकत्र होते, त्यामुळे आमची चिंता वाढलेली आहे''. फक्त श्रीलंका बोर्डच नाही तर बीसीसीआयला सुद्धा चिंतेत आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल म्हणाले ''श्रीलंकेच्या काही खेळाडूंनी बायो-बबलच्या नियमांचे उल्लंघण केले आहे. त्यामुळे आम्ही भारतीय संघ आणि व्यवस्थापकांना सर्तक राहण्यास सांगितले आहे.

पुढे ते म्हणाले ''हो, आम्हाला परिस्थितीची जाणीव आहे पण टीमला आमचा संदेश पूर्वीसारखाच आहे. ते निघण्यापूर्वी आम्ही त्यांना कोविड संदर्भात अतिरिक्त सावधगिरी बाळगण्यास सांगितले होते. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या कोरोना अहवाला वरती आमचे लक्ष आहे, जर खेळाडू पॉझिटीव्ह आले तर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ''.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com