इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) पुढच्या वर्षी दोन नविन संघ येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर त्याच्या स्वरुपात बदल (IPL Format Change) होणार आहे. संघ वाढले म्हणजे अर्थात सामन्यांची संख्या वाढणार आहे. जवळपास ९४ सामने होण्याची शक्यता आहे. परंतू भारतीय नियामक मंडळ (BCCI) एवढे सामने घ्यायला अनुकूल नाहीये. या व्यतिरीक्त बीसीसीआय ७४ सामने घ्यायला अनुकूल असून त्यासाठी ६० दिवसाची विंडो लागेल. याचबरोबर आयपीएल २०११ सालच्या हंगामाची पुनरावृत्ती करणार आहे. २०११ मध्येही २ नविन संघ जोडले गेले होते. म्हणजेच आता संघांना एकमेकां बरोबर दोन सामने खेळावे लागणार नाहीत, त्याऐवजी ५-५ संघांचे दोन गट केले जातील.
कसा असेल IPL 2022 चा हंगाम?
- 10 संघांना ५-५ च्या गटात विभागले जाईल
- गटातील ५ संघ एकमेकांबरोबर दोन सामने खेळतील
- सर्व संघांचे अंतिम अंक पाहून क्रमवारी ठरवली जाईल
- प्लेऑफच्या सध्याच्या स्वरुपाप्रमाणे अंतिम फेरीपूर्वीही एक एलिमिनेटर आणि क्वालीफायर असतील
आता आयपीएलमध्ये दोन नविन येणार आहेत. त्याचबरोबर अहमदाबादच्या संघासाठी अदानी ग्रुप बोली लावणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. दोन नविन संघांच्या वाढी बरोबरच आयपीएलची रंगत आणखी वाढणार आहे. यापूर्वीही २०११ साली आयपीएलमध्ये १० संघ होते.
बीसीसीआयला कसा फायदा होईल?
- आयपीएलमध्ये दोन नविन संघ असतील.
- चार खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती.
- प्लेऑफ धरुण ९४ सामन्यांऐवजी ७४ सामन्यांचे स्वरुप
- ५४ दिवसांच्या सध्याच्या आयपीएलच्या दिवसात वाढ करुण, ते ६० दिवस करण्यात येईल
- ५-५ संघांचा ग्रुप केला जाईल जसे २०११ ला स्वरुप होते.
-१४ अतिरिक्त सामन्यांमुळे बीसीसीआयला ८०० कोटाचा फायदा होईल, त्याचबरोबर दोन नविन संघांमुळे २००० कोटा अतिरिक्त मिळतील.
- फ्रँचायझींना पगाराची मर्यादा 100 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याची परवानगी असल्याने खेळाडू त्यांच्या आयपीएल करारामधून अधिक पैसे कमवू शकतील.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.