Team India News: यंदा टीम इंडियाच उंचावणार टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी! जुळून आला खास योगायोग

T-20 World Cup Winner Prediction: यावेळी भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावू शकतो. काय आहे योगायोग? जाणून घ्या.
Team India News: यंदा टीम इंडियाच उंचावणार टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी! जुळून आला खास योगायोग
indian cricket teamtwitter
Published On

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करत स्पर्धेतील सुपर ८ फेरीत धडक दिली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत ४ सामने खेळले. यापैकी ३ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला, तर १ सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. ७ गुणांची कमाई करत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा कॅनडाविरुद्ध होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे धुतला गेला. दरम्यान पावसाने भारतीय संघाला मोठी गुड न्यूज दिली आहे.

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर ११ वर्ष उलटून गेली आहेत. भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. २०२३ मध्ये भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्याची संधी होती. मात्र या दोन्ही स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकून भारतीय संघाला आयसीसीच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याची संधी असणार आहे.

Team India News: यंदा टीम इंडियाच उंचावणार टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी! जुळून आला खास योगायोग
Team India News: टीम इंडियाच्या या ३ खेळाडूंना सुपर ८ मध्ये संधी मिळणं कठीण! संपूर्ण स्पर्धेत बसावं लागेल बाहेर

जुळून आला योगायोग

भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना हा कॅनडाविरुद्ध होणार होता. हा सामना फ्लोरिडातील ब्रोवार्ड रिजनल पार्क स्टेडियममध्ये होणार होता. मात्र पावसामुळे एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह भारतीय संघाच्या दुसऱ्यांदा टी-२० चॅम्पियन बनण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी भारतीय संघाने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यावेळी भारतीय संघाचा १ सामना पावसामुळे रद्द झाला होता. यावेळीही भारतीय संघाचा १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे भारतीय संघ यंदा ट्रॉफी उंचावणार असे संकेत दिसून येत आहेत.

Team India News: यंदा टीम इंडियाच उंचावणार टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी! जुळून आला खास योगायोग
England vs Namibia, Super 8: नामिबियाला धूळ चारत इंग्लंडचं दमदार कमबॅक! सुपर ८ मध्ये जाण्यासाठी असं आहे समीकरण

भारतीय संघाने स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर २२ जून रोजी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना बांगलादेश किंवा नेदरलँडविरुद्ध होऊ शकतो. तर शेवटचा सामना २४ जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com