टीम इंडियाचं 2022 चं वेळापत्रक जाहीर; T-20 वर्ल्ड कपचं समोर आव्हान तसेच..

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौरा जानेवारीत सुरू राहणार आहे.
टीम इंडियाचं 2022 चं वेळापत्रक जाहीर; T-20 वर्ल्ड कपचं समोर आव्हान तसेच..
टीम इंडियाचं 2022 चं वेळापत्रक जाहीर; T-20 वर्ल्ड कपचं समोर आव्हान तसेच..Twitter/ @BCCI

टीम इंडियाने 2021 मध्ये चांगली कामगिरी केली पण पुन्हा एकदा ती एकही ICC ट्रॉफी जिंकू शकले नाही. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचली होती पण फायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभूत झाले होते. टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र, भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर अप्रतिम कामगिरी करत बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. आता वर्ष संपलं आणि आता नवीन वर्ष 2022 ची वेळ आली आहे. या वर्षीही टीम इंडियाला (Team India) भरपूर क्रिकेट खेळायचे आहे आणि अनेक मोठी आव्हाने समोर येणार आहेत. टीम इंडियाचे 2022 चे वेळापत्रक काय आहे ते पाहूयात.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दौरा जानेवारीत सुरू राहणार आहे. टीम इंडिया 2022 चा पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. दुसरी कसोटी जोहान्सबर्ग येथे खेळवली जाणार आहे. यानंतर 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये तिसरी कसोटी सुरू होईल. कसोटी मालिकेनंतर 19 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे.

टीम इंडियाचं 2022 चं वेळापत्रक जाहीर; T-20 वर्ल्ड कपचं समोर आव्हान तसेच..
IPL 2022: नवे वर्ष, नवा हंगाम, नवे कर्णधार? कोण असतील 10 धुरंधर

IND vs WI

फेब्रुवारीमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून वनडे मालिकेला (ODI Cricket) सुरुवात होणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना 9 फेब्रुवारीला जयपूर आणि तिसरा एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारीला कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. यानंतर तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 15 फेब्रुवारी रोजी कटकमध्ये खेळवला जाईल. दुसरी T20 18 फेब्रुवारीला विशाखापट्टणममध्ये, तिसरी T20 20 फेब्रुवारीला त्रिवेंद्रममध्ये खेळवली जाईल.

IND vs SL

श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांची मालिका फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 फेब्रुवारीला बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. दुसरा कसोटी सामना 5 मार्चपासून मोहालीत सुरू होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिका (T-20 Series) सुरु होणार आहे. पहिला T-20 सामना 13 मार्च रोजी मोहालीत खेळवला जाईल. दुसरा T-20 सामना 15 मार्च रोजी धर्मशाला येथे, तिसरा T-20 सामना 18 मार्च रोजी लखनौ येथे होणार आहे.

टीम इंडियाचं 2022 चं वेळापत्रक जाहीर; T-20 वर्ल्ड कपचं समोर आव्हान तसेच..
Omicron News: जानेवारी फेब्रुवारीत काळजी घ्यावी लागणार; अजित पवारांचे आवाहन

IPL 2022

आयपीएल 2022 (IPL 2022) एप्रिल-मेमध्ये खेळवला जाईल, ज्याच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, परंतु जूनमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पहिली T20 चेन्नईत 9 जूनला, दुसरी T20 12 जूनला बेंगळुरूमध्ये, तिसरी T20 14 जूनला नागपुरात होणार आहे. चौथी T20 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि पाचवी T20 19 जून रोजी दिल्लीत खेळवली जाणार आहे.

IND vs ENG

टीम इंडिया जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. 1 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे गेल्या वर्षातील शेवटची उर्वरित कसोटी खेळणार आहे. टीम इंडिया मालिकेत 2-1 ने पुढे असून इंग्लंडमध्ये मालिका जिंकण्याची संधी त्यांना असणार आहे. याशिवाय टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 3 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळणार आहे. पहिली T-20 7 जुलै रोजी साउदम्प्टन येथे, दुसरी T-20 9 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे आणि तिसरी T-20 नॉटिंगहॅम येथे 10 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 12 आणि 14 जुलै रोजी लंडनमध्ये एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने होणार आहेत. तिसरा वनडे 17 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार आहे.

IND vs WI

टीम इंडियाचा सामना जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजशी होणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून तेथे तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. या दौऱ्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. सप्टेंबरमध्ये भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत भाग घेणार आहे, त्यामुळे त्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

IND vs AUS

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी त्यांच्या घरच्या मैदानावर होणार आहे. या दौऱ्यात 4 कसोटी, 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. वेळापत्रक अजून जाहीर व्हायचे आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर 2022 टी-20 विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. टीम इंडियाला 2022 ची एकमेव ICC टूर्नामेंट जिंकायला नक्कीच आवडेल. वर्षाचा शेवट बांगलादेश दौऱ्याने होईल ज्यामध्ये टीम इंडिया 2 कसोटी आणि 3 वनडे खेळणार आहे. ज्यांचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com