IND vs AUS WTC Final 2023: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.
आयसीसी रँकिंगमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी आहे तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे टॉप २ संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करणं भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल. कारण भारतीय संघाचा या मैदानावरील रेकॉर्ड हवा तितका खास नाही. भारतीय संघाने या मैदानावर १४ सामने खेळले आहेत. यादरम्यान केवळ २ सामने जिंकता आले आहेत. तर ५ सामन्यांमध्ये पराभव आणि ७ सामने ड्रॉ झाले आहेत.
कसा आहे ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड?
भारतीय संघाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाला देखील या मैदानावर हवी तशी कामगिरी करता आली नाही. ३८ पैकी केवळ ७ सामन्यांमध्ये या संघाला विजय मिळवता आला आहे. तर १७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तसेच भारत आणि ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला तर, दोन्ही संघ १०६ वेळेस आमने सामने आले आहेत. यापैकी ४४ वेळेस ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ ठरला आहे. तर ३२ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. २९ सामने ड्रॉ झाले तर १ सामना टाय झाला होता. (Latest sports updates)
भारतीय संघाचा आत्मविश्वास वढवणारी बाब म्हणजे, या मैदानावर खेळलेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. सप्टेंबर २०२१ मध्ये या मैदानावर इंग्लंडला १५७ धावांनी पराभूत केलं होतं.
या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली होती. त्यामुळे या सामन्यात नक्कीच भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढलेला असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.