Rohit Sharma Retirment: रोहित क्रिकेटला रामराम करणार? प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये गंभीर काय म्हणाला?

Gautam Gambhir On Rohit Sharma Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यानंतर गौतम गंभीरने रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत भाष्य केलं आहे.
Gautam Gambhir: रोहित क्रिकेटला रामराम करणार? प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये गंभीर काय म्हणाला?
gautam gambhirtwitter
Published On

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमीफायनलच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला.

भारताचा फायनलचा सामना येत्या ९ मार्चला रंगणार आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात जो संघ विजय मिळवेल, तो संघ भारतासोबत फायनलमध्ये खेळताना दिसेल. दरम्यान सेमीफायनलचा सामना झाल्यानंतर भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिलं. दरम्यान गंभीरला रोहितच्या निवृत्तीबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता.

Gautam Gambhir: रोहित क्रिकेटला रामराम करणार? प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये गंभीर काय म्हणाला?
IND vs AUS : इथेच सामना फिरला, अन्यथा भारताच्या हातून फायनल निसटली असती,VIDEO

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, गंभीरला रोहितबाबत प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने विचारले, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित आणखी किती वेळ भारतीय संघासाठी खेळताना दिसून येऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर देताना गंभीरने रोहितचं कौतुक करायला सुरुवात केली. त्याने रोहितच्या भविष्याबाबत कुठलंही वक्तव्य केलं नाही. मात्र त्याचं इतकं कौतुक केलं, की पत्रकाराला त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळालं.

गंभीर म्हणाला, ' रोहितच्या खेळीचं मुल्यांकन हे त्याने किती धावा केल्या आहेत हे पाहूण नाही, तर त्याच्या खेळीमुळे किती इम्पॅक्ट पडतोय हे पाहून केलं जातं.' गंभीरच्या मते, रोहित धावा करतोय की नाही, हे जास्त महत्वाचं नाही. त्याचं संघात असणं हेच जास्त महत्वाचं आहे.

Gautam Gambhir: रोहित क्रिकेटला रामराम करणार? प्रेस कॉन्फ्रेन्समध्ये गंभीर काय म्हणाला?
Ind Vs Aus Match Highlights : विराटची संयमी खेळी ते हार्दिकची हार्ड हिटिंग, ही आहेत भारताच्या विजयाची प्रमुख कारणे

गंभीर म्हणाला, ' आता चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल येणार आहे. त्याआधी मी काय बोलू शकतो? जर संघाचा कर्णधार इतकी वेगवान सुरुवात करुन देत असेल, तर ड्रेसिंग रुमसाठी हे चांगले संकेत आहेत. तुम्ही धावा पाहून मुल्यांकन करतात. आम्ही धावा पाहून मुल्यांकन करत नाही. आम्ही इम्पॅक्ट पाहून मुल्यांकन करतो.' रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यातही दमदार सुरुवात करुन दिली होती. आता भारतीय संघ फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे .त्यामुळे फायनलमध्येही रोहितकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com