ENGvsIND: भारतीय संघ इंग्लंडचा बदला घेईल ? ;काय असेल Playing 11

भारत आणि इंग्लंड (ENGvsIND) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे.
ENGvsIND
ENGvsINDTwitter/ @BCCI
Published On

भारत आणि इंग्लंड (ENGvsIND) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. भारतीय संघाने (Team India) 2007 नंतर इंग्लंडमध्ये कधीही मालिका जिंकलेली नाही. कर्णधार विराट कोहलीचा संघ हा विक्रम मोडतो का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे,

ENGvsIND
ENGvsIND: भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान; संघ निवडीसाठी करावा लागणार संघर्ष

कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नॉटिंगहॅम कसोटीच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, भारतीय संघ या वेळी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. संघ इंग्लंडच्या गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देईल. याशिवाय, कोहली पुढे म्हणाला दोन महिने इंग्लंडमध्ये राहून संघाला खूप फायदा झाला आहे. सर्व खेळाडू याचा लाभ घेतील. भारतीय संघ 2018 मध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) च्या अंतिम सामन्यात पराभूत झाला. भारतीय संघ आता या डब्ल्यूटीसी दुसऱ्या मोसमाची सुरुवात या मालिकेने करणार आहे.

सामन्यापूर्वीच इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने म्हटले आहे की, भारताने हिरव्या खेळपट्टीबद्दल तक्रार करू नये. हे स्पष्ट आहे की भारतीय संघाला इंग्लंडमधील हिरव्या खेळपट्टीवर खेळावे लागेल. जेथे वेगवान स्विंग गोलंदाजांना चांगली मदत मिळेल.

भारतीस संभाव्य संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर अश्विन, शार्दुल ठाकूर/रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com