
Virat Kohli: टीम इंडियाचा (Team India) दिग्गज बॅट्समन विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपल्या संपत्तीमुळे चर्चेत आला आहे. विराट कोहलीच्या संपत्तीचा जो आकडा समोर आला आहे ते पाहून तुमचेही डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही. विराट कोहलीची संपत्ती (Virat Kohli Net Worth) 1000 कोटी रुपयांपार गेली आहे. इन्स्टाग्रामवर 252 मिलिअन फॉलोअर्स असलेल्या कोहलीच्या एकूण संपत्तीबाबत स्टॉक ग्रोने हा खुलासा केला आहे. विराट कोहली कशी आणि कुठून कमाई करतो हे आपण पाहणार आहोत...
समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपयांवर पोहचली आहे. विराट कोहलीची ही संपत्ती जगातील सर्व क्रिकेटपटूंपेक्षा जास्त आहे. 34 वर्षीय विराटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 'A+' श्रेणीत स्थान दिले आहे. विराटला करारानुसार बीसीसीआयकडून वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. याशिवाय बीसीसीआय त्याला टेस्ट मॅच खेळण्यासाठी 15 लाख रुपये, एका वनडे मॅचसाठी 6 लाख रुपये आणि टी-20 मॅचसाठी 3 लाख रुपये देते.
टीम इंडियाव्यतिरिक्त विराट कोहली आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) म्हणजेच आरसीबीकडून खेळतो. आरसीबी विराट कोहलीला एका सीझनसाठी 15 कोटी रुपये देतो. खेळाव्यतिरिक्त कोहलीकडे अनेक ब्रँड्स आहेत. त्याने ब्लू ट्राइब, युनिव्हर्सल स्पोर्ट्सबिझ, एमपीएल आणि स्पोर्ट्स कॉन्व्होसह सात स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे.
विराट कोहली हा जाहिरातदारांचा खूपच लाडका आहे. विराट कोहली 26 ब्रँडच्या जाहिरातील करतो. विराट प्रत्येक जाहिरात शूटसाठी वर्षाला 7.50 ते 10 कोटी रुपये घेतो. जाहीराती बाबतीत तो बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रात सध्या आघाडीवर आहे. अशा ब्रँड एंडोर्समेंटमधून तो सुमारे 175 कोटी रुपये वर्षाला कमावतो. याशिवाय विराट फुटबॉल, टेनिस आणि कुस्ती संघांचाही मालक आहे.
विराट कोहली फक्त क्रिकेट आणि जाहिरातीमधून कमाई करत नाही तर तो सोशल मीडियाचा बादशहा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तो कमाई करतो. सोशल मीडियाबद्दल सांगायचे झाले तर, विराट कोहली इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी 8.9 कोटी रुपये घेतो. त्याचवेळी, ट्विटरवर तो एका पोस्टसाठी अडीच कोटी रुपये घेतो.
विराट कोहलीची दोन घरे आहेत. मुंबई आणि गुरुग्राममध्ये त्याची घरं आहेत. मुंबईतील घराची किंमत 34 कोटी रुपये आणि गुरुग्राममधील घराची किंमत 80 कोटी रुपये आहे. याशिवाय विराट कोहलीला आलिशान कारचीही प्रचंड आवड आहे. त्याच्याकडे तब्बल 31 कोटी रुपयांच्या आलिशान कार आहेत. त्याच्याकडे आर 8 व्ही 10 प्लस, आर 8 एलएमएक्स, ए 8 एल, क्यू 8, क्यू 7, आरए 5 आणि एस 5 सारख्या ऑडी कार आहेत. याशिवाय त्यांच्याकडे फॉर्च्युनर, रेंज रोव्हर या आलिशान कार देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.