
Brad Currie Viral Catch Video: क्रिकेटमध्ये आतापर्यंत असे असंख्य कॅच पकडले गेले आहेत. जे कॅच पाहून फलंदाजासह प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. मात्र इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी -२० ब्लास्ट स्पर्धेत एका खेळाडूने क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
टी -२० ब्लास्ट स्पर्धेत १६ जून रोजी ससेक्स आणि हॅम्पशायर या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात स्कॉटलंडच्या २४ वर्षीय ब्रॅड करीने अप्रतिम क्षेत्ररक्षण करत अविश्वसनीय झेल टिपला आहे. हा झेल पाहून फलंदाज इतका शॉक झाला की, त्याने थेट डोक्यालाच हात लावला. तर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना शब्दच फुटत नव्हते.
तर झाले असे की, या सामन्यातील १९ वे षटक सुरू होते. हॅम्पशायर संघाला विजय मिळवण्यासाठी ११ चेंडूंमध्ये २३ धावांची गरज होती. त्यावेळी टायमल मिल्स गोलंदाजी करण्यासाठी आला होता.
फलंदाजी करत असलेल्या बेनी हॉवेलने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. षटकार मारण्यासाठी त्याने मिडविकेटच्या दिशेने जोरदार बॅट फिरवली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता. मात्र त्यानंतर असं काही घडलं जे क्वचितच पाहायला मिळतं. (Latest sports updates)
चेंडू वेगाने सीमारेषेच्या बाहेर जात होता, त्यावेळी ब्रॅड करी (Brad Currie) धावत आला आणि डाव्या बाजूला डाईव्ह मारत भन्नाट झेल टिपला. झेल टिपण्यासाठी तो काही सेकंद हवेतच होता. जेव्हा खाली पडला तेव्हा चेंडू त्याच्या हातातच होता. हा झेल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.