Ceat Cricket Rating Awards: रोहित शर्मा ठरला 'क्रिकेटर ऑफ द इयर', राहुल द्रविडचाही मोठा सन्मान

Rohit Sharma, Cricketer Of The Year Award: भारतीय संघातील स्टार फलंदाज रोहित शर्माची क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचाही मोठ्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
Ceat Cricket Rating Awards: रोहित शर्मा ठरला 'क्रिकेटर ऑफ द इयर', राहुल द्रविडचाही मोठा सन्मान
rohit sharmatwitter
Published On

मुंबईत सिएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर आणि राहुल द्रविड यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती.

भारताला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या आणि यावर्षी दमदार कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माला क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. यासह भारताला ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा लाईफटाईम अचिवमेंट अवॉर्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या लंडनमध्ये आहे. त्यामुळे तो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकला नव्हता. विराटची बॅट यावर्षीही चांगलीच तळपली. भारताला वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचवण्यात विराटने मोलाची भूमिका बजावली होती. याच दमदार कामगिरीच्या बळावर त्याचा वनडे क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

Ceat Cricket Rating Awards: रोहित शर्मा ठरला 'क्रिकेटर ऑफ द इयर', राहुल द्रविडचाही मोठा सन्मान
Rohit Sharma Statement: दारुण पराभवानंतर रोहित शर्मा भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

मोहम्मद शमीलाही मिळाला पुरस्कार

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची जेव्हा चर्चा होईल तेव्हा मोहम्मद शमीचं नाव आवर्जून घेतलं जाईल. शमीला या स्पर्धेतील सुरुवातीचे काही सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतर, शमीसाठी भारतीय संघाचे दार उघडले. शमी शेवटी येऊन या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला.

या दमदार कामगिरीच्या बळावर त्याची 'वनडे बॉलर ऑफ द इयर' म्हणून नेमणूक करण्यात आली. यासह भारताचा कसोटी संघातील गोलंदाज आर अश्विनचाही ' मेन्स टेस्ट बॉलर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

या महिला खेळाडूंनाही मिळाला पुरस्कार

भारतीय महिला संघातील फलंदाज स्म्रिती मंधानाचा ' विमेंस इंडीयन बॅटर ऑफ द इयर ' म्हणून सन्मान करण्यात आला. तर दीप्ती शर्माचा' विमेंस इंडीयन बॉलर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Ceat Cricket Rating Awards: रोहित शर्मा ठरला 'क्रिकेटर ऑफ द इयर', राहुल द्रविडचाही मोठा सन्मान
Team India News: टीम इंडियासाठी वाईट बातमी! स्टार खेळाडूचं कमबॅक होणं कठीण; जय शहांनी दिली मोठी अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com