T20 World Cup Final: पाकिस्तान-इंग्लंड अंतिम सामन्यासाठी नियमांमध्ये मोठा बदल, काय फरक पडणार?

PAK vs ENG
PAK vs ENGSaam TV

T20 World Cup Final: T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना रविवारी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. दरम्यान मेलबर्न क्रिकेट ग्राउंडने या अंतिम सामन्यासाठी नियमांमध्ये काही बदल केले आहेत, जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा वापर करता येईल.

रविवारी मेलबर्नमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हा बदल सामन्याच्या नियोजित वेळेसाठी आहे. अशा परिस्थितीत सामना पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ द्यावा लागला तर तो देता येईल. (Sports News)

PAK vs ENG
सात सीनिअर खेळाडू टीम इंडियात असतील तर...; जडेजाने काढला रोहित शर्मावर राग

13 नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दिवशी मेलबर्नमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, इतकेच नाही तर 14 नोव्हेंबर हा अंतिम सामन्याचा राखीव दिवस आहे. त्या दिवशीही पाऊस पडू शकतो, त्यामुळे नियोजित वेळेत आणखी काही वेळ जोडण्यात आला आहे.

आयसीसीने आता अंतिम सामन्यासाठी आणखी दोन तास जोडले आहेत, जेणेकरून गरज पडल्यास त्याचा वापर करता येईल. अंतिम सामन्यातील कोणत्याही निकालासाठी, दोन्ही संघांना 10-10 षटके खेळणे आवश्यक आहे, जर एवढाही खेळ झाला नाही तर पाकिस्तान-इंग्लंड संयुक्त विजेता म्हणून घोषित केले जातील.

PAK vs ENG
Team India: भारतीय संघात होणार मोठे बदल, रोहित शर्मा, विराट कोहली बाहेर जाणार? कारण...

रविवारी सामना पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे आयसीसीचे म्हणणे आहे, मात्र राखीव दिवशी जाण्याची गरज भासल्यास दुसऱ्या दिवशी सामना लवकर सुरू होईल. तसेच आदल्या दिवशी जिथे थांबला होता त्यापासून पुढे सामना सुरू होईल.

विश्वचषकातील जवळपास चार-पाच सामने पावसामुळे वाहून गेले आहेत. यातील बहुतांश सामने मेलबर्नमध्ये झाले, त्यामुळे तो धोका कायम आहे. मेलबर्नमध्ये 13 नोव्हेंबरला 95 टक्के आणि 14 नोव्हेंबरला 90 टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच दोन्ही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com