T-20 World Cup: खराब फॉर्मशी झुंज देत असलेला भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) टी-20 विश्वचषकात आपली मोहीम पुन्हा रुळावर आणण्याच्या प्रयत्नात बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे, त्याचबरोबर सर्वांच्या नजरा या संघ निवडीकडे असणार आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आजच्या सामन्यात सीनियर ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनला (R. Ashwin) प्लेइंग-11 मध्ये संधी देतो की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. अश्विन चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळलेला नाही. त्याने शेवटचा सामना 2017 मध्ये किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात चाहत्यांनी प्रचंड राडा केला. अफगाणिस्तानचे बहुतेक चाहते तिकीट नसतानाही स्टेडियममध्ये खुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची संख्या खूप जास्त होती, जी हाताळण्यासाठी पोलिसांना नंतर बळाचा वापर करावा लागला. हे लक्षात घेऊन अबुधाबीला मैदान प्रशासन सतर्क असणार आहे. अफगाणिस्तानमध्येही भारतीय संघाची प्रचंड क्रेझ आहे आणि त्यांच्या संघाविरुद्धच्या सामन्यातही चाहते स्टेडियमवर गेल्या सामन्यात जे काही पाहायला मिळाले होते, तसे काही करू शकतात. त्यामुळे स्टेडियमच्या सुरक्षेसाठी आणखी मार्शल आणि पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दणदणीत पराभवानंतर भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानने स्कॉटलंड आणि नामिबियाला हरवण्याबरोबरच पाकिस्तानला पराभवाच्या उंबरठ्यावर नेले पण आसिफ अलीने एका षटकात चार षटकार मारून त्यांच्याकडून विजय हिसकावून घेतला. आता मोहम्मद नबी आणि राशिद खान यांना भारताविरुद्धच्या टी-२० लीगमध्ये खेळण्याचा अनुभव अफगाणिस्तानच्या कामी येवू शकतो.
या फॉरमॅटमधील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवणाऱ्या कोहलीला चांगली संघनिवड करेल, अशी अपेक्षा आहे. अश्विनसारख्या गोलंदाजाला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्याच्या पिढीतील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एकाला सहा महिने संघात स्थान देऊनही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जात नाही, असे जागतिक क्रिकेटमध्ये कधीच ऐकायला मिळाले नाही. अश्विनला संधी संघात संधी द्यावी याच्या विरोधात विराट कोहली होता अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
आता भारताला स्पर्धेत टिकण्यासाठी अफगाणिस्तानविरुद्धची लढत जिंकण्याची गरज असणार आहे. अफगाणिस्तानचे सलामीवीर हजरतुल्ला झाझई आणि मोहम्मद शहजाद हे भारताच्या वेगवान माऱ्यासमोर टिकाव धरणार नाहित. परंतु अफगाणिस्तानसाठी नवीन चेंडू हाताळणारे हमीद आसन आणि नवीनुल हक हे खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात परंतु केएल राहुल आणि रोहित शर्मा यांचे आव्हान त्यांच्यासाठी खडतर असेल. दोन खराब सामन्यांनंतर रोहित आणि राहुल पुनरागमन करण्याच्या विचारात असतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.