T-20 World Cup: जर असं झालं तर भारतीय संघ सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो

UAE मध्ये सुरु असलेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक होता, मात्र पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघाला स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका आहे.
T-20 World Cup: जर असं झालं तर भारतीय संघ सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो
T-20 World Cup: जर असं झालं तर भारतीय संघ सेमीफायनल मध्ये जाऊ शकतोSaam Tv
Published On

UAE मध्ये सुरु असलेल्या T20 विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांपैकी एक होता, मात्र पहिले दोन सामने गमावल्यानंतर संघाला स्पर्धेतून बाहेर जाण्याचा धोका आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाने टीम इंडियाचे सेमीफायनल गाठण्याचे समीकरण बिघडले आहे. भारतीय संघ गट 2 मध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तान आणि नामिबियासारखे संघ गुणतालिकेत भारतीय संघाच्या पुढे आहेत.

T-20 World Cup: जर असं झालं तर भारतीय संघ सेमीफायनल मध्ये जाऊ शकतो
Breaking: दोन महिने नाॅट रीचेबल असलेले अनिल देखमुख ED कार्यालयात हजर!

अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडविरुद्ध, भारताला केवळ सामने जिंकण्याची गरज नाही, तर सगळ्या गोष्टी भारताच्या बाजूने जायला हव्यात. टीम इंडियाचा रन रेट आधीच घसरला आहे आणि T20 वर्ल्ड कप ग्रुप 2 पॉइंट टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे.

* टीम इंडियाचा नेट रन रेट -1.609 आहे. ते दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानपेक्षाही खाली आहेत, ज्यांचा रन रेट +3.097 आहे.

* भारताला केवळ विजयाचेच वेध लागणार नाहीत, तर अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्धच्या गटातील उर्वरित सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. एका पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता पूर्णपणे नष्ट होणार आहे.

* अफगाणिस्तानचा संघ न्यूझीलंडचा पराभव करून उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहील अशी विराट कोहली अँड कंपनीला आशा आहे. नामिबिया आणि स्कॉटलंडने न्यूझीलंडविरुद्ध पलटवार केल्यास याचा टीम इंडियालाही फायदा होऊ शकतो.

* उर्वरीत सर्व सामने जिंकूनही कोहलीचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकत नाही. त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भारताचे आगामी सामने

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबू धाबी - बुधवार 3 नोव्हेंबर

भारत विरुद्ध स्कॉटलंड, दुबई - शुक्रवार 5 नोव्हेंबर

भारत विरुद्ध नामिबिया दुबई - सोमवार ८ नोव्हेंबर

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com