Suryakumar Yadav Supla Shot: सूर्याचा 'सूपला' शॉट नाही पाहिला तर काय पाहिलं! षटकार मारताच मास्टर ब्लास्टरने दिली अशी प्रतिक्रिया

Sachin Tendulkar Reaction On Suryakumar Yadav Shot:
suryakumar yadav
suryakumar yadavtwitter

GT VS MI, Qualifier 2: आयपीएल २०२३ स्पर्धेत शनिवारी क्वालिफायर २ चा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने जोरदार कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघावर ६२ धावांनी विजय मिळवला आहे.

सु्र्यकुमार यादवने पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या गिलच्या खेळीला टक्कर देण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न अपुरा ठरला. तो ६१ धावा करत माघारी परतला. दरम्यान या खेळीदरम्यान त्याने एक लक्षवेधी शॉट मारला आहे.

ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

suryakumar yadav
MI vs GT Qualifier 2: हार्दिकने करून दाखवलं! गुजरात सलग दुसऱ्यांदा IPL फायनलमध्ये; मुंबईचा मोठा पराभव

सूर्यकुमार यादव हा चौफेर फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. गेल्या काही महिन्यात त्याने मिस्टर ३६० म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जेव्हा तो फलंदाजी करत असतो त्यावेळी गोलंदाजही विचारात पडतो की, सूर्याला चेंडू टाकावं तरी कुठं.

असाच काहीसा प्रकार गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात पाहायला मिळाला. २३४ धावांचा पाठलाग करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.

सुपला शॉटने वेधलं लक्ष...

इतर फलंदाज जास्तीत जास्त शॉट्स हे व्हीमध्ये खेळतात. सूर्यकुमार यादव देखील व्हीमध्ये शॉट खेळतो. मात्र त्याचा व्ही हा मागच्या दिशेने आहे. शॉर्ट चेंडूवर इतर फलंदाज पूल शॉट मारण्याच्या प्रयत्नात असतात. तर या उलट सूर्यकुमार यादवला शॉर्ट चेंडू मिळाला की, तो थेट किपरच्या डोक्यावरून षटकार मारतो.

असाच काहीसा शॉट त्याने जोशुआ लिटीलच्या चेंडूवर मारला आहे. तर झाले असे की, गुजरात टायटन्स संघाकडुन गोलंदाजी करण्यासाठी जोशुआ लिटील गोलंदाजीला आला होता. दरम्यान त्याने शॉर्ट चेंडू टाकला ज्यावर सूर्यकुमार यादवने किपरच्या वरून थर्ड मॅनच्या दिशेने लांबलचक षटकार मारला. या षटकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताय. (Latest sports updates)

गुजरातचा जोरदार विजय..

तसेच या सामन्याबद्गल बोलायचं झालं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय पुर्णपणे चुकीचा ठरवत गुजरातच्या फलंदाजांनी जोरदार सुरुवात केली.

गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि १० गगनचुंबी षटकार मारले. तसेच साई सुदर्शनने ४३ धावांची विस्फोटक खेळी केली. शेवटी कर्णधार हार्दिक पंड्याने २८ धावांचे योगदान देत संघाची धावसंख्या २३३ पर्यंत पोहचवली.

मुंबई इंडियन्स संघाकडून या धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ४३ आणि कॅमेरून ग्रीनने ३० धावांची बहुमूल्य खेळी केली. मात्र मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात ६२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com