Shreyas Iyer Replacement: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका सुरु होण्यार्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता.
त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत कुठलीच माहिती समोर आली नाहीये. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली गेली होती मात्र तो देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. अशातच ३ असे फलंदाज आहेत, जे श्रेयस अय्यरची जागा घेऊ शकतात.
संजू सॅमसन:
चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी संजू सॅमसन परफेक्ट चॉईस आहे. कारण आक्रमक फलंदाजी करण्यासह संजू सॅमसन यष्टिरक्षकाची देखील भूमिका पार पाडू शकतो. त्याने आतापर्यंत ११ वनडे सामन्यांमध्ये ३३० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १७६ च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. (Latest sports updates)
दीपक हुड्डा:
या यादीत दीपक हुड्डा दुसऱ्या स्थानी आहे. दीपक हुड्डा मधल्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो.
तसेच तो मोठ मोठे फटके खेळण्यासाठी देखील ओळखला जातो. जर दीपक हुड्डाला श्रेयस अय्यरच्या जागी संधी दिली गेली तर भारतीय संघात आणखी एका अष्टपैलू खेळाडूची भर पडेल. कारण आक्रमक फलंदाजीसह तो गोलंदाजीसाठी देखील ओळखला जातो.
राहुल त्रिपाठी :
राहुल त्रिपाठीला गेल्या वर्षी बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत संधी दिली गेली होती. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले गेले नव्हते.
त्यांनतर श्रीलंका सांघाविरुद्ध झालेल्या मालिकेत संधी दिली गेली नव्हती. तरीदेखील त्याची टी-२० क्रिकेटमधील कामगिरी पाहता त्याला श्रेयस अय्यरच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.