Team India: सूर्यकुमारमुळे विराटची 'ती' जागा जाणार? सूर्यकुमारच्या शतकामुळे टीम इंडियात मोठ्या बदलांची शक्यता

टीम इंडियाने रविवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला.
VIrat-Surya
VIrat-SuryaSaam Tv
Published On

मुंबई : T20 विश्वचषकातील पराभवानंतर आता बीसीसीआयने टीम इंडियामध्ये मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. कर्णधारापासून बॅटिंग ऑर्डरपर्यंत अशा अनेक बदलांची मागणी होत आहे. आता टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला पोहोचली, तेव्हा हा प्रयोग करण्याची संधी मानली जात होती. टीम इंडियाने रविवारी दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 65 धावांनी पराभव केला. (Latest Marathi News)

कर्णधार हार्दिक पांड्याचा पहिला प्रयोग येथे पाहायला मिळाला, जो यशस्वी ठरला. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते, त्याने याचा फायदा घेत केवळ 51 चेंडूत 111 धावांची खेळी केली. हार्दिकच्या या प्रयोगामुळे टीम इंडियाचा तणावही वाढू शकतो कारण नियमितपणे फक्त विराट कोहली नंबर-3 वर खेळतो. अशा स्थितीत विराट कोहली परतला तर टीम इंडियासाठी नंबर-3 वर कोण उतरेल, सूर्यकुमार यादव की विराट कोहली असा प्रश्न निर्माण होईल.  (Cricket News)

VIrat-Surya
Ind vs NZ 3rd T20 : रिषभ पंतचा पत्ता कट? ओपनिंग स्पेशालिस्ट 'धाकड' फलंदाजाला मिळणार संधी

गेल्या काही काळात विराट कोहली नंबर-3 वर येऊन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे दिसून आले आहे. मात्र रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीची सुरुवात संथ होत आहे. जर सूर्यकुमार यादव येथे आला तर तो धावांचा वेग वाढवू शकतो.

2021 मध्ये T20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केल्यापासून, सूर्यकुमार यादव धावांचा पाऊस पाडत आहे आणि 45 च्या सरासरीने धावा करत आहे. तसेच 2022 मध्ये त्याने 1000 हून अधिक धावा केल्या आहेत, विशेष म्हणजे सूर्याने सर्वाधिक धावा क्रमांक 4 वर फलंदाजी करताना केल्या आहेत. अशा परिस्थितीत कधी त्यांच्याकडे षटके कमी असतात तर कधी फलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल नसते.

VIrat-Surya
T20 वर्ल्डकपमध्ये मोठा बदल, २० संघ, पात्रता फेरीही नाही; असा असेल नवा फॉरमॅट

सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 181.64 आहे, याचा अर्थ तो टॉप-3 मध्ये येऊन धावांचा वेग वाढवू शकतो. त्याच्या तुलनेत विराट कोहलीचा करिअरचा स्ट्राइक रेट 137.96 आहे. रोहित शर्मा 139.24 आणि केएल राहुल 139.12 सूर्याच्या खूप मागे आहेत.

टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाची सलामीची जोडी बदलण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. केएल राहुल आणि रोहित शर्मा ही जोडी काही काळापासून चमकदार कामगिरी दाखवू शकली नाही. अशा परिस्थितीत विराट कोहलीनेही ओपनिंगला फलंदाजी केली तर संघाला फायदा होऊ शकतो. विराट कोहलीने ओपनिंग करताना आपल्या T20 कारकिर्दीतील एकमेव शतक झळकावले आहे.

नंबर-3 वर कोणाचा रेकॉर्ड कसा?

>> सूर्यकुमार यादव - 8 सामने, 8 डाव, 293 धावा, 48.83 सरासरी

>> विराट कोहली - 78 सामने, 78 डाव, 3047 धावा, 55.40 सरासरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com