Suresh Raina News : टीम इंडियाचा आणि चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज सुरेन रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृ्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर रैना कॉमेन्ट्रेटरच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र आता रैना नव्या व्यवसायात उतरला आहे. सुरेश रैनाने आपलं स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. दिल्ली, मुंबई नव्हे तर थेट परदेशात रैनाने हे रेस्टॉरंट सुरु केलं आहे.
सुरेश रैनाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करुन त्याबद्दल माहिती दिली आहे. रैनाने नेदरलँडच्या अॅमस्टरडॅममध्ये त्याने स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. अॅमस्टरडॅममध्ये परदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यात भारतीयांचाही समावेश असतो. त्यामुळे या सर्वांसाठी एक उत्तम पर्याय म्हणून त्याचे हे रेस्टॉरंट असेल. इथे भारतीयांना अस्सल भारतीय खाद्यपदार्थांची चव चाखता येईल.
सुरेश रैनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, अॅमस्टरडॅममधील रैना इंडियन रेस्टॉरंटची ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे, जिथे माझी खाण्याची आणि स्वयंपाकाची आवड पूर्ण होत आहे. गेल्या काही वर्षांत तुम्ही माझे खाण्याबद्दलचे प्रेम पाहिले आहे आणि माझ्या स्वयंपाकाबद्दलचं साहसही पाहिलं. भारताच्या विविध भागांतून अगदी अस्सल जेवण थेट युरोपच्या मध्यभागी आणण्याचे ध्येय आहे. (Latest News)
सुरेश रैनाची क्रिकेट कारकीर्द
भारतासाठी रैनाने 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामने खेळले आणि सर्व फॉरमॅटमध्ये 7000 हून अधिक धावा केल्या. 2008 ते 2021 दरम्यान तो आयपीएल स्पर्धेच्या प्रत्येक मोसमात खेळला. रैनाने 205 आयपीएल सामने खेळले आहेत. रैनाने यात 5500 हून अधिक धावा केल्या आहेत. रैनाने आयपीएलमध्ये CSK आणि गुजरात लायन्सकडून खेळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.