Mary Kom Retirement: मेरी कोमने बॉक्सिंगमधून निवृत्तीची केली घोषणा, 6 वेळा पटकावलं विश्वविजेतेपद

Mary Kom Announces Retirement: भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. मेरी कोमच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Mary Kom Announces Retirement
Mary Kom Announces RetirementSaam Tv
Published On

Mary Kom Announces Retirement:

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने निवृत्तीची घोषणा केली आहे. मेरी कोमच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. वयोमर्यादेमुळे निवृत्ती घेत असल्याचं तिने सांगितलं आहे.

मेरी कोम ही सहा वेळा विश्वविजेती आणि 2012 ऑलिम्पिक पदक विजेती आहे. आपल्या खेळातील चांगल्या कामगिरीमुळे तिने भारताचं नाव जगभरात उंचावलं. तिला पाहून अनेक मुली बॉक्सिंग सारख्या साहसी खेळात आज मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mary Kom Announces Retirement
Hardik Pandya : फिटनेस जपूनही हार्दिक पांड्या ट्रोल; जिमचे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकरी विचारला थेट प्रश्न

इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनच्या (IBA) नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सरना फक्त 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धांमध्ये भाग घेण्याची परवानगी आहे. एका कार्यक्रमादरम्यान 41 वर्षीय मेरी कोमने सांगितले की, ''तिला अजूनही चांगल्या स्तरावर स्पर्धा करण्याची इच्छा आहे. मात्र वयोमर्यादेमुळे तिला तीच करिअर इथेच थांबवावं लागेल. मी माझ्या आयुष्यात सर्व काही मिळवले आहे.''  (Latest Marathi News)

सहा वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी पहिली महिला बॉक्सर

बॉक्सिंगच्या इतिहासात सहा वेळा विश्वविजेतेपद पटकावणारी मेरी ही पहिली महिला बॉक्सर आहे. ती पाच वेळा आशियाई चॅम्पियनही आहे. मेरी कोमने 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली महिला बॉक्सर ठरली.

Mary Kom Announces Retirement
BCCI Awards: शुभमन गिल ठरला बेस्ट क्रिकेट ऑफ इयर; जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?

मेरी कोमने लंडन 2012 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. तिच्या करिअरमध्‍ये क्वचितच असं झालं असेल की, कोणत्‍याही विक्रमाला किंवा विजेतेपदाला तिला स्पर्श करता आलं नसेल. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी तिने जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला. त्यावेळी मेरी पेनसिल्व्हेनियातील स्क्रॅंटन येथे आयोजित जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी गेली होती.

त्या स्पर्धेत तिने 48 किलो गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत ती मागे पडली असली तरी तिने येथे स्वत:ला सिद्ध केलं आणि बॉक्सिंगमध्ये भारताचा गौरव केला. त्यानंतर लगेचच महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॉक्सर ठरली. मेरी कोमने 2005, 2006, 2008 आणि 2010 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com