Hardik Pandya : फिटनेस जपूनही हार्दिक पांड्या ट्रोल; जिमचे फोटो पोस्ट केल्यानंतर नेटकरी विचारला थेट प्रश्न

Hardik Pandya : वर्कआउटचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्याला ट्रोल केलंय. ऑल राउंडर हार्दिक पांड्या संघात पुनरागमन करण्यासाठी जिममध्ये घाम गाळत आहे. परंतु ट्रोल्सने त्याला ट्रोल केले आहे.
Hardik Pandya workout
Hardik Pandya workoutANI
Published On

Hardik Pandya New Workout Video:

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्ड कप २०२३ च्यावेळी दुखाग्रस्त झाला होता. त्यावेळपासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान हार्दिक पांड्या आयपीएल खेळण्यास मैदानात उतरले अशी शक्यता आहे. त्यासाठी तो मोठी मेहनत घेत असून आपल्या फिटनेसकडे लक्ष देत आहे. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. (Latest News)

यातच तो २०२४ च्या टी२० विश्वचषकासाठी कितपत तंदुरुस्त आहे हे सिद्ध होईल. यासाठी तो आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे. त्यासाठी तो जिममध्ये घाम गाळत आहे. परंतु त्याचं घाम गाळणं ट्रोर्ल्सच्या पचनी पडलं नाही. हार्दिक पांड्याने जिममध्ये व्यायाम करत असल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. परंतु हार्दिकचे फोटो पाहून नेटकरी संतापले असून त्यांनी त्याला ट्रोल करणं सुरू केलं आहे.

  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्दिक पांड्याने २ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यानचे सुमारे ५६ वर्कआउट व्हिडिओ आणि अनेक फोटो शेअर केले आहेत. या काळात तो जिममध्ये डंबेल किंवा इतर मशिनच्या सहाय्याने मेहनत करताना दिसला. हार्दिक अनेक व्हिडिओंमध्ये धावताना दिसत आहे. म्हणजेच आता तो पूर्णपणे फिट दिसत आहे. दरम्यान हार्दिकने शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांनी त्याला ट्रोल केले आहे.

हार्दिकच्या नवीन वर्कआऊट व्हिडिओवर एका यूजरने लिहिले की, 'भाऊ, कृपया बॅटिंगच्या सरावाचे फोटो पोस्ट देखील अपलोड कर. आम्‍ही अनेक दिवसांपासून तुला फलंदाजी करताना पाहिले नाही. तुझी आठवण येतेय. तर एका युझरने लिहिलं की, भाई काहीही कर, शिवम (शिवम दुबे) ने तुझी जागा घेतलीय. आणखी एका युजरने कमेंट करत लिहिले की, हार्दिक भाई, तुम्ही फक्त सराव कराल की मैदानातही याल. त्याचवेळी, रोहित शर्माच्या फॅन ब्रिगेडने हार्दिकच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Hardik Pandya workout
BCCI Awards: शुभमन गिल ठरला बेस्ट क्रिकेट ऑफ इयर; जाणून घ्या कोणाला मिळाला कोणता पुरस्कार?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com