Viral Catch Video: पैज लावा असा कॅच तुम्ही पाहिलाच नसेल! Six जाणार असं वाटत असतानाच..., पाहा Video

Charith Asalanka Catch Video: या सामन्यात चरीथ असलंकाने भन्नाट झेल टिपला आहे.
Charith Asalanka Catch Video
Charith Asalanka Catch VideoTwitter
Published On

Charith Asalanka Catch Video:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार सुरू आहे. पहिला सामना श्रीलंका आणि नेदरलँड या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना २६२ धावा केल्या आहेत.

दरम्यान श्रीलंकेकडून चरीथ असलंकाने बाऊंड्री लाईनवर झेपावत एक भन्नाट झेल टिपला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

तर झाले असे की, नेदरलँड संघाची फलंदाजी सुरु असताना ४९ वे षटक टाकण्यासाठी कसून रजीथा गोलंदाजीला आला होता. त्यावेळी नेदरलँड संघातील फलंदाज लोगान वॅन बीक ५९ धावांवर फलंदाजी करत होता.

Charith Asalanka Catch Video
Viral Cricket Video: बंगळुरूत Live सामन्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, पुढे जे घडलं..पाहा Video

लोगान चांगलाच सेट झाला होता. त्यावेळी रजीथाने षटकातील चौथा चेंडू स्लोवर चेंडू टाकला. या चेंडूवर बीकने स्लॉग शॉट मारला. हा चेंडू डिप मिड विकेटच्या वरून सहा धावांसाठी जात होता. इतक्यात चरीथ असलंकाने डाइव्ह मारत भन्नाट झेल टिपला. हा झेल पाहुन कोणालाच विश्वास बसत नव्हता. या झेलचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

नेदरलँडने केल्या २६२ धावा..

या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडकडून सायब्रँड एंगेलब्रटने ८२ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली. तर लोगान वॅन बीकने ७५ चेंडूंचा सामना करत १ चौकार आणि १ षटकाराच्या साहाय्याने ५९ धावांची खेळी केली.

कॉलिन एकरमनने ३१ चेंडूंचा सामना करत २९ धावा चोपल्या. नेदरलँडचा डाव ४९.४ षटकात २६२ धावांवर संपुष्टात आला. श्रींलेकला हा सामना जिंकण्यासाठी २६३ धावांची गरज आहे.

Charith Asalanka Catch Video
Viral Video: ऑस्ट्रेलियन फॅनवर चढला इंडियन फिव्हर! पाकविरूद्धच्या सामन्यात दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा; Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com