भारताच्या फलंदाजांनी पाडला धावांचा पाऊस, पण विजयाच्या अपेक्षांवर आफ्रिकेनं पाणी फेरलं

दक्षिण आफ्रिकेच्या रासी वेन डुसेनने नाबाद 75 धावांची तर डेव्हिड मिलरने 64 धावांची दमदार खेळी केली.
South Africa wins Against india
South Africa wins Against indiasaam tv
Published On

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिकेत पाच टी-२० सामन्यांची (India vs south Africa T-20 ) सीरिज आजपासून सुरु झाली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इशान किशन (Ishan Kishan) आणि ऋतुराज गायकवाडने ओपनिंग करत भारताच्या पहिल्या इनिंगला सुरुवात केली. दरम्यान, सलामीवीर फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यर, कर्णधार (Rishabh Pant) रिषभ पंत, हार्दिक पंड्या (Hardik pandya) यांच्या चौफेर फटकेबाजीमुळं २० षटकात भारताची धावसंख्या ४ बाद २११ वर पोहोचली. परंतु, २१२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं १९.१ षटकात २१२ धावा करत भारताचा पराभव केला.

South Africa wins Against india
रिषभ पंत टीम इंडियाचा कर्णधार; गर्लफ्रेंड झाली खूश, इन्स्टाग्रामवर शेअर केला जबरदस्त मेसेज

दक्षिण आफ्रिकेच्या रासी वेन डुसेनने 46 चेंडूत नाबाद 75 धावा कुटल्या. तर डेव्हिड मिलरने 31चेंडूत 64 धावांची दमदार खेळी केली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारताचे 212 धावांचे आव्हान 19.1 षटकात पार केले. भारताकडून भुवनेश्वर, अक्षर आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डिकॉक एक मोठी खेळी खेळण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, अक्षर पटेलने त्याला 22 धावांवर बाद केले. त्यामुळे आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. क्विंटन डिकॉकने 22 धावांची खेळी करुन माघारी गेल्यानंतर डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. त्याने दमदार अर्धशतक ठोकत संघाला 16 व्या षटकात 150 शतकी मजल मारून दिली.

दरम्यान, इशानने आक्रमक फलंदाजीचा जोर कायम ठेवून ४८ चेंडूत ७६ धावा कुटल्या. इशानच्या अर्धशतकी खेळी,ऋतुराजने केलेली धडाकेबाज सुरुवात आणि त्यानंतर मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यर, कर्णधार (Rishabh Pant) रिषभ पंत, हार्दिक पंड्या (Hardik pandya) यांच्या चौफेर फटकेबाजीमुळं २० षटकात भारताची धावसंख्या ४ बाद २११ वर पोहोचली. त्यामुळं दक्षिण आफ्रिकेपुढं विजयासाठी २१२ धावांचं आव्हान भारताने दिलं होतं.

South Africa wins Against india
भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजमध्ये कोरोनाचा शिरकाव, आफ्रिकेचा 'हा' स्टार खेळाडू पॉझिटिव्ह

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या आजच्या टी-२० सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार टेम्बा बावुमाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारताच्या खेळाडूंनी मैदानावर अक्षरश:धावांचा पाऊस पाडला. २० षटकांमध्ये २११ धावांची मजल मारत भारताने दक्षिण आफ्रिकेला तगडं आव्हान दिलंय.

दरम्यान, दोनशेहून अधिक धावसंख्या करण्यात फंलंदाजांनी मोलाचं योगदान दिलं. सलामीला आलेल्या इशानने ४८ चेंडूत ७८ धावा कुटल्या. ऋतुराज गायकवाडने १५ चेंडू २३ धावा, श्रेयस अय्यर २७ चेंडू- ३६ धावा, कर्णधार रिषभ पंत १६ चेंडू २९ धावा, तर हार्दिक पंड्याने २५८ च्या सरासरीनं १२ चेंडूत ३१ धावांची चौफेर फटकेबाजी केली. यामध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com