नवी दिल्ली : गेल्या महिन्यात आयपीएलच्या १५ व्या पर्वाचा समारोप झाल्यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सीरिजला (India vs south Africa T-20) आजपासून सुरुवात झालीय. मात्र, आफ्रिकेच्या कॅम्पमधून खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. साऊथ आफ्रिकेचा स्टार खेळाडू एडन मार्करमला कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु याचा कोणताही परिणाम सामन्यावर झाला नाहीय. दिल्लीच्या (Delhi) अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका मध्ये सामना सुरु होण्यापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यावेळी शेवटच्या टप्प्यात करण्यात आलेल्या चाचणीत ए़डन मार्कम कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळला. त्यानंतर मार्कमला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, मार्कमची प्रकृती ठीक असून तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे, अशी माहिती क्रिकेट बोर्डाने दिलीय. तसंच एडन मार्कम सोडून आफ्रिका संघातील इतर सर्व खेळाडू कोरोना निगेटीव्ह आले आहेत.
भारत - दक्षिण आफ्रिका सीरिज सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला. कारण, भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या के एल राहुलला तसेच फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला दुखापत झाल्याने दोघेही सीरिजमधून बाहेर झाले आहेत. त्यामुळे के एल राहुलच्या अनुपस्थित भारताचा धडाकेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. त्यामुळे रिषभवर आता आयपीएलचा फॉर्म देशासाठी दाखवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेसाठी टेम्बा बावुमा कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.