Aus vs SA : मानलं राव! दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला, ऑस्ट्रेलियाचा जिगरबाज विजय

south africa vs australia : ऑस्ट्रेलियानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय मिळवला.
south africa vs australia/X
south africa vs australia/XSAAM TV

Australia won by 3 wickets :

कठीण काळातही संयम, जिद्द आणि चिकाटीनं खेळ कसा करावा आणि प्रतिस्पर्धी संघावर विजय कसा मिळवायचा याचं उत्तम उदाहरण ऑस्ट्रेलियानं जगभरातल्या क्रिकेट संघांसमोर ठेवलं. ऑस्ट्रेलियानं पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ३ गडी राखून विजय मिळवला. एकवेळ ७ बाद ११३ अशी अवस्था झालेली असताना, लाबुशेननं डाव सावरून दक्षिण आफ्रिकेच्या तोंडचा घास हिरावला.

south africa vs australia/X
Asia Cup 2023: बाबरने मोडला विराटचा रेकॉर्ड, पाकिस्तानात आनंदाची लाट, पण पुढच्याच चेंडूवर दांड्या गुल, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या एकदिवसीय सामन्यात ३ गडी राखून पराभूत केलं. ब्लूमफोंटेंनच्या मँगॉन्ग ओवल मैदानावर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं २२२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं ४०.२ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला.

कन्कशन सब्स्टिट्युट खेळाडू म्हणून आलेल्या मार्नस लाबुशेननं नाबाद ८० धावा केल्या. त्याने ८ विकेटसाठी एश्टन एगरच्या साथीने ११२ धावांची भागीदारी रचली आणि संघाला सहज विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेकडून तेम्बा बावुमाने नाबाद ११४ धावा केल्या.

south africa vs australia/X
IND vs PAK, Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का; मॅचविनर गोलंदाज आशिया कपमधून बाहेर?

ऑस्ट्रेलियानं या विजयासह पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० ने आघाडी मिळवली. या मालिकेतील दुसरा सामना याच मैदानावर ९ सप्टेंबरला होणार आहे. (Latest Marathi News)

दक्षिण आफ्रिकेची पडझड थांबलीच नाही

प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच संथ झाली. ९ व्या षटकात क्विंटन डीकॉकने विकेट गमावली. त्यानंतर रासी वान डर डसेन यानं अवघ्या ८ धावा केल्या आणि तंबूत परतला कर्णधार बावुमा हा अखेरपर्यंत मैदानावर राहिला. पण दुसऱ्या बाजूने त्याला कुणाचीही साथ मिळू शकली नाही. अॅडन मार्करमने १९ धावा, हेनरिक क्लासेनने १४ धावा केल्या. डेविड मिलरला खातंही उघडता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने सर्वबाद २२२ धावा केल्या.

२२३ धावांचं माफक आव्हान घेऊन मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. दुसऱ्याच चेंडूवर डेविड वॉर्नर बाद झाला. कर्णधार मिचेल मार्शने १७ धावा, जोश इंग्लिस याने एक धाव, तर एलेक्स कॅरीने ३ धावा केल्या. मार्कस स्टॉयनिसने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अवघ्या १७ धावांवर तो बाद झाला. ऑस्ट्रेलियाची एकवेळ ७ बाद ११३ धावा अशी स्थिती होती.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कॅमरन ग्रीनला दुसऱ्याच चेंडूंवर कगिसो रबाडाने बाउन्सर मारला. तो चेंडू त्याच्या हेल्मेटवर लागला. फिजिओकडून तपासणी केल्यानंतर रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या जागी कन्कशन सब्स्टिट्युट म्हणून मार्नस लाबुशेन आला आणि त्यानं संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com