टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानेn (Rohit Sharma) वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला T20 (IND vs SA 1st T20) सामना जिंकताच भारतीय संघ एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घालू शकतो. आणि हाच विक्रम करण्यासाठी रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका मालिकेतून विश्रांती घेणार नाही.
जुलैमध्ये होणाऱ्या वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या मालिकेपूर्वी भारताला जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत टी-20 मालिका खेळायची आहे. रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका मालिकेतून विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सलग 13 टी-20 सामने जिंकण्याचा नवा विश्वविक्रम रचण्यासाठी उत्सुक आहे. सध्या भारताचा विक्रम अफगाणिस्तान आणि रोमानियाशी बरोबरीत आहे.
निवड समितीतील एका सदस्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका मालिकेला ब्रेर घेणार नाही. तो या मालिकेमध्ये खेळणार आहे. आयपीएल प्लेऑफ दरम्यान आमची संघ निवडीबाबत बैठव होणार आहे. फिटनेस टेस्टसाठी संघ मालिकेच्या अगोदर पाच दिवस एनसीएमध्ये जमणार आहे. T20 विश्वचषक 2021 नंतर अफगाणिस्तानविरुद्ध भारताची विजयी वाटचाल सुरू झाली.
विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर रोहित शर्माने विजयी मालिका सुरू ठेवली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने T20 मालिकेत न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा 12-0 ने पराभव केला. सध्या रोहितचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. मात्र तो या मालिकेतून ब्रेक घेणार नाही. मुंबई इंडियन्स आधीच प्लेऑफमधून बाहेर पडली आहे. 21 मे रोजी त्यांचा शेवटचा साखळी सामना आहे. रोहित शर्माला एनसीएमध्ये सराव शिबिरासाठी एकत्र येण्यापूर्वी 10 दिवसांचा ब्रेक मिळणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.