IPL 2022 : मुंबई पाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर

IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी खेळाचे धमाकेदार प्रदर्शन करत गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सचा ५ गडी राखून धुव्वा उडवला.
chennai super kings lost match against mumbai indians
chennai super kings lost match against mumbai indiansSaam Tv

नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) गोलंदाजांनी खेळाचे धमाकेदार प्रदर्शन करत गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) ५ गडी राखून धुव्वा उडवला. आयपीएलच्या पाँइट टेबलवर नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या संघात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाचं कालच्या पराभवानंतर यंदाच्या आयपीएल (IPL) हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्स हे दोन्ही महत्वाचे संघ यंदाच्या हंगामातून बाहेर गेले आहेत. (IPL 2022 Latest News in Marathi )

आयपीएल हंगामात ५ वेळा विजेते ठरलेले मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चैन्नई सुपर किंग्स संघाला ९७ धावांच्या आत गुंडाळले. चैन्नई सुपर किंग्स संघाचा टी-२० फॉरमॅटमधील सामन्यात सर्वात कमी धावा असलेली दुसरी धावसंख्या आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्सने २०१३ साली मुंबई इंडियन्सच्या विरोधात ७९ धावा केल्या होत्या. या छोट्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबई इंडियन्सनं पॉवरप्ले मध्ये चार गडी गमावले. मात्र, त्यानंतर तिलक शर्मा यानं नाबाद ३४ धावा केल्या. तर ऋतिक शौकीन याने १८ धावा करत संघाला विजयाकडे नेलं. त्यानंतर शौकीन १३ षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्यावेळी संघाने ८१ धावा केल्या होत्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या डेविडनं १५ षटकाच्या पहिल्या चेंडूवर धमाकेदार षटकार ठोकला. डेविडने पुन्हा पाचव्या चेंडूवर आणखी षटकार ठोकत सामना खिशात टाकला. या सामन्यात मुकेश चौधरीनं चैन्नई सुपर किंग्स संघासाठी ४ षटकात २३ धावा देऊन तीन गडी बाद केले.

chennai super kings lost match against mumbai indians
ब्रेंडन मॅक्युलमची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती!

दरम्यान, सुरुवातीला मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. त्यांनी पहिल्या षटकात दोन गडी बाद केले. त्यानंतर चैन्नई सुपर किंग्स संघाची पडझड सुरूच राहिली. चैन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीनं संघासाठी ३६ धावा केल्या. मात्र, तरीही संघाची धावसंख्या शंभरच्या पुढे गेली नाही. यावेळी मुंबईच्या डेनियल सॅम्सनं चार षटकात १६ धावा देऊन तीन गडी बाद केले. रिले मेरेडिथ आणि कुमार कार्तिकेयनं देखील तीन-तीन षटक टाकून अनुक्रमे २७ आणि २२ धावा देऊन दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराहनं तीन षटकांमधून एक मेडन षटक टाकलं. त्यानं १२ धावा देऊन एक गडी बाद केला. मागच्या तीन सामन्यात अर्धशतकी धावा करणारा डेवॉन कॉनवे दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर मोईन अली देखील झेलबाद झाला. त्यानंतर चैन्नई सुपर किंगचे अन्य खेळाडूही अधिकवेळ मैदानात टिकू शकले नाही. रॉबिन उथप्पा देखील १ धावा करून बाद झाला. तर ऋतुराज गायकवाडनं केवळ ७ धावा ठोकून तंबूत परतला. त्यानंतर अंबाती रायडू, शिवम दुबे, ब्राव्हो, सिमरजीत सिंह अनुक्रमे १०, १०, १२, २ धावा करून बाद झाले. चैन्नई सुपर किंग्सच्या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा १८ धावा करून बाद झाले. मात्र, पाच गडी गमावत मुंबई इंडियन्सनं हा सामना खिशात टाकला. चैन्नई सुपर किंग्सच्या या पराभवाने त्यांचे आयपीएल हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com