अखेर इंग्लंडच्या कसोटी संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळाला आहे. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलमची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज इंग्लंड क्रिकेटने त्याची अधिकृत घोषणा केली आहे. ब्रेंडन मॅक्युलम सध्या इंडियन प्रीमियर लीगचा भाग आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. (Brendon McCullum England Test Team Coach)
ब्रेंडन मॅक्क्युलम या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडला पोहोचणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) अजून 2 सामने बाकी आहेत, 18 मे रोजी संघ शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडला रवाना होईल. ब्रेंडन मॅक्क्युलम कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक पद सोडण्याची शकत्या आहे.
40 वर्षीय ब्रेंडन मॅक्युलम जून महिन्यापासून प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. विशेष म्हणजे प्रशिक्षक म्हणून त्यांची पहिली मालिका त्याच्याच देश न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. 2 जूनपासून इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.
अॅशेसमधील खराब कामगिरीमुळे इंग्लंडचे माजी प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यासोबतच जो रूटनेही कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. काही वेळापूर्वीच अष्टपैलू बेन स्टोक्सची कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, आता संघाला नवा कसोटी प्रशिक्षकही मिळाला आहे.
मुख्य प्रशिक्षक होण्यावर मॅकलम काय म्हणाला?
ब्रेंडन मॅक्क्युलम सध्या कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक आहेत, त्यांनी यापूर्वी कॅरिबियन प्रीमियर लीगच्या त्रिनिबागो नाइट रायडर्सचे प्रशिक्षकपद भूषवले आहे. ब्रेंडन मॅक्क्युलम 2012 ते 2016 या काळात न्यूझीलंड संघाचा कसोटी कर्णधारही होते.
इंग्लंड संघाचा कसोटी प्रशिक्षक बनल्यानंतर ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला, 'मी या नियुक्तीने खूप आनंदी आहे आणि इंग्लंड कसोटी संघासोबत अधिक चांगले काम करू इच्छितो. मला माहीत आहे की या काळात अनेक मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागणार आहे, परंतु मला खात्री आहे की या आव्हानांना आपण एकत्रितपणे सामोरे जाऊ.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.