आगामी दक्षिण आफ्रिका (South Africa T20 Series) मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणे डोकेदुखी ठरणार आहे. २३ मे रोजी भारतीय संघाचे निवडकर्ते रोहित शर्मासोबत चर्चा करणार आहेत. भारताचे पाच प्रमुख खेळाडू सध्या दुखापतग्रस्त आहेत त्याचबरोबर तीन खेळाडू हे फॉर्ममध्ये नाहीत. या मालिकेसाठी विराट कोहलीलाही (Virat Kohli) विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. निवड समितीच्या एका सदस्याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, साहजिकच संघातील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असतात तेव्हा निवड समिती आणि संघ व्यवस्थापनासाठी ही मोठी डोकेदुखी असते.
दीपक चहर तंदुरुस्त होत आहे पण मालिकेपूर्वी आम्हाला त्याच्या फिटनेसचे मूल्यांकन करावे लागेल. सूर्यकुमार वेळेत बरा होईल असे वाटत नाही. आणि जडेजाच्या अहवालाची वाट आम्ही पाहत आहोत. रवींद्र जडेजा, दीपक चहर आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने त्यांचे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणे असंभव आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन अजूनही बरे होत आहेत त्यामुळे निवडकर्ते धोका पत्करू इच्छित नाहीत.
टीम इंडियाचे दुखापतग्रस्त खेळाडू
दीपक चहर - हॅमस्ट्रिंगची दुखापत (अजून बरी होत आहे)
रवींद्र जडेजा - बरगडीला दुखापत
सूर्यकुमार यादव - स्नायू
टी नटराजन - हॅमस्ट्रिंग
अक्षर पटेल - स्नायू
वॉशिंग्टन सुंदर - स्प्लिट वेबिंग
मात्र, ज्या खेळाडूंना विश्रांती दिली जाणार आहे, त्यांची यादीही मोठी आहे. मोहम्मद शमीशिवाय विराट कोहलीला विश्रांती देण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्स IPL 2022 च्या प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. संभाव्य ब्रेकबाबत निवडकर्ते कोहलीशी बोलून पुढील निर्णय घेतील.
टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे रोहित शर्मा दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार म्हणून उपलब्ध असणार आहे. आयपीएलनंतर तो ब्रेक घेणार असल्याची चर्चा होती. IPL 2022 च्या सामन्यांनंतर मुंबईच्या संघाला एक आठवड्याची विश्रांती मिळणार आहे.
रोहित शर्मानेही विश्वविक्रमात बनवला आहे. IND vs SA 1st T20 मधील विजय त्यांना नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करण्यास मदत करेल. T20 विश्वचषक 2021 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध भारताची विजयी वाटचाल सुरू झाली. विराट कोहलीने त्याच्या नेतृत्वाखाली 2-0 अशी आघाडी घेतल्यानंतर रोहित शर्माने विजयी मालिका सुरू ठेवली. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने T20 मालिकेत न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा 12-0 ने पराभव केला.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.