Shreyas Iyer Replacement: टीम इंडियाचा नंबर 4 चा प्रश्न सुटला! श्रेयस अय्यर WC मधून बाहेर पडल्यास या खेळाडूंपैकी एकाला मिळणार संधी

Team India News: चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न अजूनही भारतीय संघाला सतावतोय.
shreyas iyer
shreyas iyersaam tv

Shreyas Iyer: आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? काही खेळाडू आहेत ज्यांच या संघात खेळणं कन्फर्म आहे. मात्र चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार? हा प्रश्न अजूनही भारतीय संघाला सतावतोय.

shreyas iyer
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ मजबूत खेळाडूंसह मैदानात उतरण्याच्या तयारीत असणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. मात्र दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला आहे. तो खेळणार की नाही याबाबत कुठलीही अपडेट समोर आली नाही. त्यामुळे बीसीसीआयला त्याचा पर्यायी खेळाडू शोधावा लागणार आहे.

हे आहेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार..

१) फिट झाल्यास अय्यर खेळणार..

श्रेयस अय्यरने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दमदार कामगिरी केली आहे. गेल्या वर्ल्ड कपनंतर या स्थानावर फलंदाजी करताना त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने या कालावधीत २२ सामन्यांमध्ये ४७.३५ च्या सरासरीने ८०५ धावा केल्या आहेत. ज्यात २ शतके आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. जर तो पूर्णपणे फिट झाला तर तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Latest sports updates)

shreyas iyer
Kamran Akmal On Sarfaraz Khan: सरफराज खानच्या समर्थनात पाकिस्तानी खेळाडूने घेतली धाव; रोहितवर हल्लाबोल करत म्हणाला...

२) केएल राहुल..

दुखापतीमुळे जर श्रेयस अय्यर बाहेर झाला, तर त्याच्याऐवजी केएल राहुलला संधी दिली जाऊ शकते. गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर केएल राहुलने ४ सामन्यांमध्ये ६३.०० च्या सरासरीने १८९ धावा केल्या आहेत. तर चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने २४१ धावा केल्या आहेत. यात एक शतकी खेळीचा समावेश आहे. जर केएल राहुलला भारतीय संघात संधी दिली गेली तर, संघात अतिरिक्त यष्टिरक्षक खेळवण्याची गरज भासणार नाही.

shreyas iyer
ODI WC 2023: पाकिस्तानला भारतात यावच लागेल! नकार देणाऱ्या PCB ची ICC ने मोजक्या शब्दात चांगलीच जिरवली

३) अजिंक्य रहाणे:

अजिंक्य रहाणेने गेल्या ५ वर्षांपासून एकही वनडे सामना खेळलेला नाही. मात्र आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी करत त्याने चौथ्या क्रमांकासाठी प्रबळ दावेदार असल्याचं दाखवून दिलं आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने १४ सामन्यांमध्ये ३२६ धावा केल्या होत्या.

ज्यात २ अर्धशतकांचा समावेश आहे. आतापर्यंत त्याने टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २५ सामन्यांमध्ये ८४३ धावा केल्या आहेत.

आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला देखील या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली गेली होती. मात्र टी- २० मध्ये हिट असलेला सूर्यकुमार यादव हा वनडे क्रिकेटमध्ये पुर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्याची ही कामगिरी पाहता, त्याला चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळणं कठीण आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com