Team India Impact Player: टीम इंडियाची ताकद दुपटीने वाढणार! रोहित, विराट नव्हे तर 'हा' एकटा खेळाडू वेस्ट इंडिजवर पडणार भारी

IND vs WI Test Series: भारतीय संघात आणखी एक खेळाडू जो संधी मिळताच संघासाठी चमकदार कामगिरी करू शकतो.
team india
team indiasaam tv
Published On

Shardul Thakur: भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ लवकरच आमने सामने येणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

हा सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या अनुभवी खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान भारतीय संघात आणखी एक खेळाडू जो संधी मिळताच संघासाठी चमकदार कामगिरी करू शकतो.

team india
Asia Cup 2023 Schedule: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार आशिया चषक स्पर्धेतील सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघातील धाकड खेळाडूला संधी दिली जाऊ शकते. भारतीय संघातील हा धाकड खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलु खेळाडू शार्दूल ठाकूर आहे.

शार्दूल ठाकूर हा स्विंग गोलंदाजी करतो. वेस्ट इंडिजमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर हा गोलंदाज आपल्या गोलंदाजीत मिश्रण करण्यासाठी ओळखला जातो. त्यामुळे तो वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो.

फलंदाजीत ठरणार इम्पॅक्ट प्लेअर..

शार्दूल ठाकूर सुरुवातीच्या आणि अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करून विकेट्स मिळवून देण्यासाठी ओळखला जातो. यापूर्वी देखील जेव्हा जेव्हा भारतीय संघाला विकेट काढण्याची गरज होती, त्यावेळी शार्दुलने गोलंदाजीला येत विकेट काढून दिली आहे. गोलंदाजीसह तो फलंदाजीत देखील इम्पॅक्ट प्लेअर ठरू शकतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही शार्दूलने अर्धशतक झळकावले होते. शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ९ कसोटी सामन्यांमध्ये २९ गडी बाद केले आहेत. तर ३५ वनडे सामन्यांमध्ये ५० आणि २५ टी -२० सामन्यांमध्ये ३३ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

team india
IND vs WI: रोहितमुळे 'या' स्टार फलंदाजाची कारकीर्द संपली! वेस्ट इंडिजविरुद्ध आहे दमदार रेकॉर्ड

कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com