Shane Warne: वाद-विवाद, 1993 चा बॉल, सचिनची भिती अन् मृत्यू...

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीने मोठ्या फलंदाजांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शेन वॉर्नने शुक्रवारी सगळ्या जगाला आणि क्रिकेटच्या चाहत्यांना चकित केले.
Shane Warne
Shane WarneSaam Tv
Published On

गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकाच्या सुरुवातीला, जेव्हा फलंदाजांना वेगवान गोलंदाजांची भीती वाट होती. फिरकीची कला संपुष्टात आली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाने जेफ थॉमसन आणि डेनिस लिलीसारखे वेगवान गोलंदाज तयार केले, तेव्हाच जगाला ऑस्ट्रेलियाने शेन वॉर्न सारखा लेगस्पिनर दिला. वॉर्नने आपल्या फिरकीची तालावर अनेक दिग्गज फलंदाजांना नाचवले. तो त्याच्या काळातील एक प्रतिभावान फिरकीपटू होता. (Shane Warne Passes Away)

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फिरकीने मोठ्या फलंदाजांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या शेन वॉर्नने शुक्रवारी सगळ्या जगाला आणि क्रिकेटच्या चाहत्यांना चकित केले. जेव्हा संपूर्ण क्रिकेट जगत विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्याचा आनंद आणि ऑस्ट्रेलिया महान यष्टिरक्षक रॉड मार्शच्या निधना शोक व्यक्त करत होते, तेव्हाच अचानक वॉर्नने जगाचा निरोप घेतल्याच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. शेन कीथ वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Shane Warne
IPL 2022: स्पर्धेपुर्वी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मोठ्या अडचणीत...

सकाळी मित्राला श्रद्धांजली संध्याकाळी स्वत:चा मृत्यू

शुक्रवारचा दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी काळा दिवस होता. त्यांना आपल्या क्रिकेटमधील दोन दिग्गजांना गमावले. अनुभवी यष्टिरक्षक रॅड मार्शचे सकाळी निधन झाले आणि संध्याकाळी शेन वॉर्नता मृत्यू झाला. सकाळी मार्शच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना वॉर्नने लिहिले की, 'रॅड मार्शच्या निधनाच्या बातमीने दुःख झाले. ते आमच्या महान खेळडूंपैकी एक दिग्गज होते आणि अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्थान होता. त्याने क्रिकेटला विशेषत: ऑस्ट्रेलियन आणि इंग्लंड क्रिकेटला खूप काही दिले. त्याच्या कुटुंबाबाबत प्रेम. देव तुमच्या आत्म्याला शांती देवो मित्रा.

विवादांशी संबंधित

शेन वार्न आपल्या फिरकीसाठी जेवढा प्रसिद्ध होता तेवढाच तो वाद विवादासाठीही प्रसिद्ध होता. मॅच फिक्सिंगप्रकरणी त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती आणि ड्रग्ज घेतल्याचेही आरोप होते. वाईट वागणुकीसाठी आणि कर्णधारांशी भांडायला तो कुप्रसिद्ध होता. त्याला सिगारेट आणि दारूचे व्यसन होते. अनेकवेळा तो मैदानावर सिगारेट ओढतानाही दिसला होता. तो अनेकवेळा खुलेआम दारू पितानाही दिसला. 1998 मध्ये, एका बुकीला खेळपट्टी आणि हवामानाची माहिती देण्यासाठी पैसे घेतल्याबद्दल मार्क वॉ आणि त्याला क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दंड भरावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेत 2003 च्या विश्वचषकापूर्वी प्रतिबंधित लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध सेवन केल्याबद्दल तो दोषी आढळला होता. मात्र, आईने त्याला वजन कमी करण्यासाठी ते औषध दिल्याचे त्याने सांगितले. तो क्रिकेटमध्ये प्रशिक्षक असावा याच्या विरोधात होता तर त्याचं म्हणणं होतं की क्रिकेटमध्ये व्यवस्थापक असावा.

Shane Warne
Shane Warne Passes Away: ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन..

सचिन स्वप्नात येऊन भिती दाखवायचा

सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये अनेक वेळा वॉर्नचा सामना केला आणि बहुतेक प्रसंगी तेंडुलकरची बॅट जोरदार बोलली. त्यापुर्वी वॉर्नने तेंडुलकरला हलक्यात घेतले होते आणि त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकरने आपल्या बॅटच्या माध्यमातून वॉर्नला सडेतोड उत्तर दिले होते. एकेदिवशी शेन वॉर्नला हे सांगणे भाग पडले होते की सचिन स्वप्नात येऊन भिती दाखवतो.

वैयक्तिक आयुष्यावरही चर्चा झाली

शेन वॉर्न वैयक्तिक आयुष्यातही प्रसिद्धीच्या झोतात राहिला. वॉर्नने 1995 मध्ये सिमोन कॅलाहानशी लग्न केले आणि त्यांना तीन मुले आहेत. दोघे 10 वर्षे एकमेकांसोबत राहिले, परंतु वॉर्नने 2006 मध्ये त्यांचे 11 वर्षांचे संबंध संपवले. ब्रिटीश अभिनेत्री लिझ हर्लेसोबतच्या त्याच्या नात्याचीही बरीच चर्चा झाली होती. कॅलाहानपासून घटस्फोट घेतल्यानंतर, वॉर्न लिझ हर्लीशी जवळीक वाढली आणि दोघे 2010 ते 2013 पर्यंत सुमारे तीन वर्षे एकत्र होते आणि नंतर वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले.

वॉर्नचे नाव ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि डीजे एमिली स्कॉटसोबतही जोडले गेले आहे. दोघे 2006 मध्ये पहिल्यांदा भेटले होते आणि त्यानंतर काही काळ ते रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, शेनने 2013 मध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. हॉलिवूड अभिनेत्री मार्गो रॅबीसोबतच्या वॉर्नच्या नात्याबद्दलही अनेक बातम्या आल्या आहेत, पण दोघांनी कधीच याबद्दल उघडपणे बोलले नाही.

शतकातील सर्वोत्तम चेंडू

4 जून 1993 चा दिवस कोणताही क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. जेव्हा त्याने लेग ब्रेकवर इंग्लंडच्या माईक गॅटिंगला बोल्ड केले होते. चेंडू तब्बल 180 अंशात वळला होता. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस मालिकेत वॉर्नचा हा चेंडू पाहून जग थक्क झाले. त्याचा तो चेंडू नंतर शतकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून घोषित करण्यात आ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com