IPL 2022: स्पर्धेपुर्वी दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू मोठ्या अडचणीत...

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SA vs BAN) यांच्यातील क्रिकेट मालिका 18 मार्चपासून सुरू होत आहे.
Kagiso Rabada
Kagiso RabadaSaam TV
Published On

आयपीएल 2022 लवकरच सुरू होणार आहे. पण त्याअगोदरच दक्षिण आफ्रिकेने आपल्या खेळाडूंना अडचणीत टाकले आहे. त्यांची कोंडी केली आहे. IPL 2022 मध्ये सहभागी होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना आता देशभक्तीची परीक्षा द्यावी लागणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, त्यांच्यासमोर आयपीएल आणि देश यापैकी एकाची निवड करण्याचा मुद्दा उभा ठाकला आहे. तर मुद्दा असा आहे की खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेत खेळणार की इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेणार, हा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या बोर्डाने खेळाडूंवर सोडला आहे. त्यामुळे खेळाडूंसमोर पेच निर्माण झाला आहे.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SA vs BAN) यांच्यातील क्रिकेट मालिका 18 मार्चपासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर बांगलादेशला 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. एकदिवसीय सामने 18, 20 आणि 23 मार्च रोजी खेळवले जातील, तर कसोटी मालिका 31 मार्चपासून सुरू होऊन, 12 एप्रिलपर्यंत चालणार आहे. आयपीएल 26 मार्चपासून सुरु होऊन 29 मे पर्यंत चालणार आहे. आयपीएलच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी खेळाडूंना तीन दिवस क्वारंटाईन राहणे अनिवार्य आहे.

Kagiso Rabada
Shane Warne Passed Away : वयाच्या 52 व्या वर्षी शेन वॉर्नचे निधन !;पाहा व्हिडीओ

खेळाडू ठरवतील

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 किंवा बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळण्याचा निर्णय खेळाडूंवर सोडला आहे. ज्याला कसोटी कर्णधार डीन एल्गरने देशभक्तीची चाचणी म्हणून वर्णन केले आहे. एल्गरने सांगितले की, खेळाडूंना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला सांगावे लागेल की त्यांना आयपीएल 2022 मध्ये खेळायचे आहे की बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग व्हायचे आहे. खेळाडूंचे हित नक्की कशात आहे हे तरी आम्हाला कळेल.

IPL 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे 11 खेळाडू

IPL 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 11 खेळाडूंचा करार आहे. ज्यामध्ये 6 कसोटी संघाचे नियमित सदस्य आहेत. एकदिवसीय संघाकडून खेळणारे 3 खेळाडू आहेत. या खेळाडूंमध्ये कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी आणि मार्को यान्सन याशिवाय एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस आणि यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक यांचा समावेश आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com