Rinku Singh Instagram Post: Six Pack Abs अन् किल्लर लूक! रिंकूच्या हटके Photo वर गिलच्या बहिणीने केली खास कमेंट

Shahneel Gill On Rinku Singh Post: शुभमन गिलच्या बहिणीने केलेली कमेंट सध्या लक्षवेधी ठरत आहे.
rinku singh instagram post
rinku singh instagram post saam tv
Published On

Rinku Singh: आयपीएल २०२३ स्पर्धेत नुकताच पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नईने गुजरातला पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंग आपल्या फलंदाजीमुळे प्रचंड चर्चेत राहिला. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी त्याने फिनिशरची भूमिका पार पडली.

दरम्यान आता आयपीएल झाल्यानंतर त्याने मालदीवची वाट धरली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आयपीएल स्पर्धेत जोरदार कामगिरी केल्यानंतर आता विश्रांतीसाठी त्याने मालदीव गाठलं आहे. त्याचे मालदीव व्हॅकेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मैदानावर तो गोलंदाजांचा घाम काढण्यासाठी प्रसिद्ध आहे.

मात्र आता शर्टलेस फोटो करत त्याने वातावरण तापवलं आहे. या फोटोमध्ये तो सिक्स पॅक ऍब्स दाखवताना दिसनू दिसून येत आहे. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

rinku singh instagram post
WTC 2023 Final: IPL ची ट्रॉफी हुकली म्हणून काय झालं? रोहितकडे विराटला मागे सोडत इतिहास रचण्याची संधी..

शुभमन गिलच्या बहिणीची लक्षवेधी कमेंट..

रिंकू सिंगने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्मसचा पाऊस पाडला आहे. तर शुभमन गिलच्या बहिणीने केलेली कमेंट सध्या लक्षवेधी ठरत आहे. शुभमन गिलची बहीण शेहेनील गिलने कमेंट करत 'ओ हिरो..' असे लिहिले आहे. या फोटोला आतार्यंत ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

रिंकू सिंगने आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने या स्पर्धेतील १४ सामन्यांमध्ये ५९.२५ च्या सरासरीने ४७४ धावा केल्या आहेत. त्याने या हंगामात अनेकदा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी मॅच विनिंग खेळी केली आहे.

गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाला अंतिम षटकात विजय मिळवण्यासाठी २८ धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू सिंगने अंतिम षटकात ५ षटकार मारून कोलकाता नाईट रायडर्स संघाला विजय मिळवून दिला होता.

त्यानंतर लखनऊ सुपर जायन्ट्स संघाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात देखील त्याने मॅचविनिंग खेळी केली होती. मात्र शेवटच्या चेंडूवर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा विजय निसटला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com