CSK vs GT,Final 2023: प्रेम लपत नाही ओ! शुभमनची मॅच बघायला 'सारा'ची हजेरी

Sara Ali Khan: हा सामना पाहण्यासाठी साराने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे.
shubman gill
shubman gillsaam tv

CSK VS GT,IPL 2023: आयपीएल २०२२ स्पर्धेतील अंतिम सामना गतविजेते गुजरात टायटन्स आणि ४ वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघात सुरू आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हा सामना पाहण्यासाठी सारा अली खानने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

shubman gill
IPL 2023 Final Scenarios: पाऊस पडला की कोण जिंकणार? चेन्नई की गुजरात? समजून घ्या सामन्याचं समीकरण एकाच क्लिकवर

सारा अली खानची सामना पाहण्यासाठी हजेरी..

गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने संपूर्ण हंगामात जोरदार कामगिरी केली आहे. मात्र अंतिम सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तो अवघ्या ३९ धावांची खेळी करून माघारी परतला. या सामन्यात तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

शुभमन गिल हा आपल्या फलंदाजीसह लव अफेअरमुळे देखील चर्चेत असतो. कधी सारा तेंडुलकर तर कधी सारा अली खान सोबत त्याचं नाव जोडलं जातं. काही दिवसांपूर्वी सारा अली खानने त्याला अनफॉलो केल्याची बातमी समोर आली होती.

आता सारा अली खानने गुजरात विरुध्द चेन्नईचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली आहे. स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी हजेरी लावताच पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. आता हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. (Latest sports updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com