Rohit Sharma: आधी भविष्यवाणी, मग शतक... तीन दिवसांपूर्वी केलेल्या रोहितच्या त्या वक्तव्याची जोरदार चर्चा

शतकांचा दुष्काळ संपवत तब्बल 3 वर्षांनंतर रोहित शर्माने वनडेत शतक झळकावलं आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam tv

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार' रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक साजरं केलं. रोहित शर्माने 101 धावांची खेळी करत त्याच्या शतकांचा दुष्काळ संपवला. तब्बल 3 वर्षांनंतर रोहित शर्माने वनडेत शतक झळकावलं आहे. रोहितने तीन दिवसांपूर्वीच आपल्या शतकाविषयी सांगितले होते.

21 जानेवारीला न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा वनडे सामना झाला तेव्हा रोहित शर्माने 51 धावांची खेळी केली. सामन्यानंतर रोहित शर्माला विचारण्यात आले की, तो तीन वर्षांपासून शतक करू शकला नाही, यावर रोहित शर्माने आपण आपल्या कामगिरीवर खूश असल्याचं सांगितलं होतं. (Sports News)

Rohit Sharma
India vs New Zealand 3rd ODI : कॉन्वे लढला पण एकटा पडला; टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा सुफडा साफ

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला होता की, माहित आहे की, मी शतक करू शकलो नाही. पण मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. रोहितने पुढे म्हटलं की खेळात बदल करण्याचा प्रयत्न करत आहे. मला माहित आहे की मोठी धावसंख्या देखील जवळच आहे.

रोहितचं हे वक्तव्य 21 तारखेला आलं आणि 24 जानेवारी रोजी त्याने शतक ठोकलं. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 85 चेंडूत 101 धावा केल्या, ज्यामध्ये रोहित शर्माने 9 चौकार आणि 6 षटकार मारले. रोहित शर्माच्या नावावर आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये 30 शतके आहेत.

Rohit Sharma
IND vs NZ: 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावावर महाविक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके

>> सचिन तेंडुलकर - 463 सामने, 49 शतके

>> विराट कोहली - 271 सामने, 46 शतके

>> रोहित शर्मा - 241 सामने, 30 शतके

>> रिकी पाँटिंग - 375 सामने, 30 शतके

>> सनथ जयसूर्या - 54 सामने, 30 शतके

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com