IND vs NZ: 'हिटमॅन' रोहित शर्माच्या नावावर महाविक्रम, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Rohit Sharma
Rohit SharmaSaam tv

IND vs NZ, 3rd ODI: इंदूर येथे न्यूझीलंडविरोधात सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी यांना जे जमलं नाही ती कामगिरी हिटमॅन रोहित शर्माने या सामन्यात केली आहे.

रोहित शर्माने या सामन्यात 6 षटकार खेचून नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्मा आता सर्वाधिक षटकार ठोकणारा भारताचा पहिला आणि जगातील तिसरा फलंदाज बनला आहे. (Latest Marathi News)

Rohit Sharma
India vs New Zealand 3rd ODI : रोहित-गिलने धू धू धुतलं; टीम इंडियाचं न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचं आव्हान

'हिटमॅन' रोहित शर्माने (Rohit Sharma) इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे कारकिर्दीतील 30 वे शतक ठोकले. रोहितने यासामन्यातील त्याच्या धडाकेबाज खेळीत 85 चेंडूत 101 धावा केल्या. त्याच्या या आक्रमक खेळीत 6 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.

या सामन्यात चार षटकार ठोकताच रोहित सर्वाधिक षटकार ठोकणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या नावावर आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 273 षटकार आहेत. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात ही कामगिरी करणारा रोहित पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज बनला आहे.

सर्वाधिक षटकार मारणारे 5 खेळाडू

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने त्याच्या एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत 351षटकार मारले आहेत. त्यानंतर वेस्टइंडीजचा माजी खेळाडू ख्रिस गेल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेलने एकदिवसीय सामन्यात ३३१ षटकार लगावले आहेत. त्यानंतर आता रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठराला आहे.

त्याच्या नावार 27 3षटकार आहेत. रोहितनंतर चौध्या क्रमांकानर श्रीलंकेचा माजी खेळाडू सनथ जयसूर्या आहे. त्याने 270 षटकार मारले आहेत, तर पाचव्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. धोनीने एकदिवसीय सामन्यात 229 षटकार मारले आहेत.

Rohit Sharma
Shubman Gill On Fire: 4, 4, 4, 6, 4 शुभमन गिलने एकाच ओव्हरमध्ये कुटल्या इतक्या धावा; रोहित फक्त बघतच राहिला!

सर्वाधिक षटकार मारणारे 5 भारतीय

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा 273 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आहे.

धोनीने एकदिवसीय सामन्यांत 229 षटकार लगावले आहेत. त्यापाठोपाठ 195 षटकारांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत चौथ्या क्रमांकावर सौरव गांगुली असून त्याने 190 षटकार मारले आहेत, तर 155 षटकारांसह युवराज सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com