Rohit Sharma Statement: रोहित निवृत्ती केव्हा घेणार? स्वत:च केला मोठा खुलासा

Rohit Sharma Statement On Retirement: रोहित शर्माने निवृत्तीबाबत आणि वर्ल्डकप जिंकण्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
Rohit sharma statement on retirement and winning icc trophy amd2000
Rohit sharma statement on retirement and winning icc trophy amd2000yandex

भारतीय संघ सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी एक आहे. वनडे,कसोटी आणि टी-२० रँकिंगमध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. मात्र भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपूर्वी रोहितने वर्ल्डकप जिंकण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

येत्या जून महिन्यात भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यासाठी वेस्टइंडीजला रवाना होणार आहे. या स्पर्धेतील सामने वेस्टइंडीज आणि अमेरिकेत रंगणार आहेत. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.

Rohit sharma statement on retirement and winning icc trophy amd2000
LSG vs DC, IPL 2024: लखनऊला हरवण्यासाठी दिल्लीच्या संघात होणार मोठा बदल? अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर रोहित काही वर्षांत निवृ्त्तीची घोषणा करेल अशा चर्चा सुरु होत्या. मात्र आता याबाबत बोलताना रोहितने मोठं वक्तव्य केलं आहे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स शो मध्ये बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, 'मी अजूनही चांगला खेळतोय. त्यामुळे मला वाटतंय की मी आणखी काही वर्ष खेळावं. मला वर्ल्डकप जिंकायचा आहे. २०२५ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल आहे. मला आशा आहे की, भारतीय संघ जिंकेल.

Rohit sharma statement on retirement and winning icc trophy amd2000
IPL 2024, Points Table: सलग दुसऱ्या विजयानंतर मुंबईची गुणतालिकेत मोठी झेप! RCB चं टेन्शन वाढलं

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने सलग १० सामने जिंकले होते. या स्पर्धेची फायनल गाठणारा भारतीय संघ पहिलाच संघ ठरला होता. मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेत विराट कोहली हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तर रोहित शर्माने देखील ५०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com