Rohit Sharma Viral Video: 'शांत रहा जरा..' समायरासोबत जात असताना रोहितचा फॅन्सला इशारा; Cute Video व्हायरल

Rohit Sharma Video: दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो फॅन्सला शांत राहण्याचा इशारा करताना दिसून येत आहे.
rohit sharma said fans to not make noise as samaira sleeping cute video viral amd2000
rohit sharma said fans to not make noise as samaira sleeping cute video viral amd2000twitter

Rohit Sharma Viral Video:

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी(७ मार्च) डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तो फॅन्सला शांत राहण्याचा इशारा करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा आपल्या मुलीसोबत असल्याचं दिसून येत आहे. रोहितची मुलगी समायरा झोपेत आहे, त्यामुळे रोहित शर्मा फॅन्सला शांत राहण्याचा इशारा करताना दिसून येत आहे. रोहित शर्मा नेहमी एयरपोर्टवर आपल्या पत्नी आणि मुलीसोबत दिसून येतो. त्याची पत्नी रितिका सजदेह त्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर हजेरी लावत असते.

rohit sharma said fans to not make noise as samaira sleeping cute video viral amd2000
Kolkata Knight Riders: यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदावरुन काढण्याचा निर्णय घेतला. ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळताना मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे ३ सामने गमावले आहेत. (Cricket news in marathi)

तसेच रोहितच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ४३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने २६ धावांची खेळी केली. दरम्यान राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता.

rohit sharma said fans to not make noise as samaira sleeping cute video viral amd2000
IPL 2024 Points Table: हैदराबादची भरारी, चेन्नईच्या पराभवाचा २ संघांना फटका; गुणतालिकेत झाली मोठी उलथापालथ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com