IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.
IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO
ind vs bantwitter
Published On

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३७६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. भारतीय संघ सध्या या सामन्यात आघाडीवर आहे. मात्र सुरुवातीच्या षटकांमध्ये रोहित शर्माकडून एक मोठी चूक झाली. ज्यामुळे रोहित शर्माला सिराजची माफी मागावी लागली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना चौथे षटक सुरु होते. त्यावेळी मोहम्मद सिराज गोलंदाजी करण्यासाठी आला. सिराजने टाकलेला चेंडू फलंदाजी करत असलेल्या जाकीर हसनच्या पॅडला जाऊन लागला.

त्यावेळी सिराजने जोरदार अपील केली. अंपायरने नॉट आऊट देताच, सिराजला रिव्ह्यू हवा होता. मात्र रिषभ पंतने त्याला रिव्ह्यू घेऊ नकोस असा इशारा केला. त्यामुळे रोहितने रिव्ह्यू घेण्यास नकार दिला. मात्र जेव्हा रिप्लेमध्ये पाहिलं गेलं त्यावेळी फलंदाज बाद असल्याचं दिसून आलं. रिषभ पंतने सिराजची माफी मागितली. त्यानंतर रोहित शर्माही हसताना दिसून आला.

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO
IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

भारतीय संघाची दमदार सुरुवात

या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण देण्यात आलं होतं. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच ३ मोठे धक्के बसले होते. बांगलदेशचा युवा वेगवान गोलंदाज हसन महमूदने सुरुवातीच्या एका तासात भारताचा टॉप ऑर्डर फोडून काढला. मात्र त्यानंतर आर अश्विनच्या शतकी खेळीच्या बळावर, भारतीय संघाने ३७६ धावांपर्यंत मजल मारली.

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO
IND vs BAN, 1st Test: आणखी काय हवं..अश्विनचं अर्धशतक पूर्ण होताच वडिलांकडून कौतुकाचा वर्षाव, PHOTO व्हायरल

बांगलादेशचा संपूर्ण डाव १४९ धावांवर गारद

या सामन्यात भारतीय संघाचा पहिल डाव ३७६ धावांवर आटोपला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेश संघाचा डाव अवघ्या १४९ धावांवर गारद झाला. बांगलादेशकडून शाकीब अल हसनने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. तर लिटन दासने २२ आणि मेहदी हसनने २७ धावांची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com