रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'

आयसीसी टी-20 विश्वचषकातील (ICC T-20 World Cup) पराभव विसरून भारतीय क्रिकेट (Team India) संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका आपल्या खिशात घातली आहे.
रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'
रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'Saam TV

आयसीसी टी-20 विश्वचषकातील (ICC T-20 World Cup) पराभव विसरून भारतीय क्रिकेट (Team India) संघाने न्यूझीलंडविरुद्धची मालिका आपल्या खिशात घातली आहे. नवा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) पहिल्या सामन्यात दमदार विजयासह संघाची सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात कर्णधाराने आणखी एक अप्रतिम खेळी खेळली आणि एक शानदार विक्रम आपल्या नावावर केला आहे. रांची येथे झालेल्या दुसऱ्या T20 मध्ये त्याने षटकारांच्या बाबतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सलग दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला भारतीय गोलंदाजांना थोडाफार मार खावा लागला परंतु नंतर संघाने जोरदार पुनरागमन करत किवी संघाला १५३ धावांपर्यंत रोखले. या सामन्यात कर्णधाराने शानदार अर्धशतक झळकावून विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीदरम्यान रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 450 षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे.

रोहितनं एकाच सामन्यात मोडला दोन दिग्गजांचा रेकॉर्ड; बनला 'सिक्सर किंग'
'धरण ऊशाला अन् कोरड घशाला'; महाविरतरण कडून क्रुषी पंपाचा वीज पुरवठा खंडित

450 षटकारांचा टप्पा पुर्ण

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा रोहित हा केवळ तिसरा फलंदाज आहे. रांची टी-२० मध्ये पहिला षटकार मारताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने 404 व्या डावात हा पराक्रम केला असून त्याने पाकिस्तानचा महान खेळाडू शाहिद आफ्रिदीला मागे टाकले आहे. आप्रिदीने 450 वा षटकार मारण्यासाठी 487 डाव घेतले होते. वेस्ट इंडिजचा फलंदाज ख्रिस गेलने 499 डाव खेळून हा विक्रम केला होता.

ख्रिस गेलचाही मोडला रेकॉर्ड

रोहितने 450 षटकारासह एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सर्वात जलद 450 षटकारांचा विक्रम आफ्रिदीच्या नावावर आहे. 11 टी-20 सामन्यांमध्ये रोहितने 5 हून अधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलने 10 टी-20 सामन्यांमध्ये 5 किंवा त्याहून अधिक षटकार मारले होते. कसोटी क्रिकेटमध्ये केवळ 63 षटकार ठोकणाऱ्या रोहित शर्माने वनडेमध्ये 244 वेळा चेंडू स्टेडियमबाहेर पोहोचवला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 146 षटकार आहेत. अशा प्रकारे त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 450 षटकारांची यादी पुर्ण केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com