WTC Final: टीम इंडियातील 'या' खेळाडूची बॅट तळपली तर ऑस्ट्रेलियाचं काही खरं नाही! इंग्लंडमधील दमदार रेकॉर्ड एकदा पाहाच..

Rohit Sharma: भारतीय संघात असा एक फलंदाज आहे जो ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न मोडु शकतो.
team india
team india saam tv

Rohit Sharma Record In England: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना ७ ते ११ जून दरम्यान लंडनच्या केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे.

हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू जोर लावताना दिसून येणार आहेत. रविवारी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे.

दुसरीकडे भारतीय संघात असा एक फलंदाज आहे जो ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याचं स्वप्न मोडु शकतो.

team india
Team India News: WTC Final तोंडावर असताना टीम इंडियासाठी वाईट बातमी; संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

हा खेळाडू ठरू शकतो ऑस्ट्रेलियासाठी कर्दनकाळ..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसुन येणार आहे. या सामन्यात जर रोहित शर्माची बॅट तळपली तर नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडणार आहे.

रोहित शर्माने इंग्लंडमध्ये जोरदार कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना ६ कसोटी सामन्यांमध्ये ४२.३६ च्या सरासरीने ४६६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतक देखील झळकावले आहे. तो इंग्लंडमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारा फलंदाज आहे. (Latest sports updates)

team india
WTC Final, New Rules: काय सांगता? फिल्डरलाही हेल्मेट घालणं बंधनकारक! पाहा WTC च्या अंतिम सामन्यासाठी काय आहेत नवे नियम

या फलंदाजांनी धावा करणं गरजेचं...

रोहित शर्मासह विराट कोहली देखील इंग्लंडमध्ये तुफान फटकेबाजी करतो. विराटने १६ सामन्यांमध्ये ३३.३२ च्या सरासरीने १०३३ धावा केल्या आहेत.

तर चेतेश्वर पुजाराने १५ सामन्यांमध्ये २६.०३ च्या सरासरीने ७२९ धावा केल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी ५-५ अर्धशतके तर १-१ शतके झळकावली आहेत. त्यामुळे या फलंदाजांनी देखील रोहितला साथ देणं गरजेचं असणार आहे.

भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com