कोल्हापूरच्या रिया पाटीलची उत्तुंग कामगिरी; नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत तीन सुवर्ण पदकांची कमाई

देशभरातून एकूण 450 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
Riya PAtil
Riya PAtilSaam TV

कोल्हापूर : कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने गुवाहाटी येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्राने 428 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. (Sports News)

रियाने 100 मीटर फ्रीस्टाईल सुवर्णपदाक, 50 मीटर फ्रीस्टाईल सुवर्णपदक, 50 मीटर बॅकस्ट्रोक सुवर्णपदक अशी चमकदार कामगिरी केली आहे. आसाममधील गुवाहाटी शहरातील डॉ. झाकीर हुसेन अँकवेटिक कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत 25 राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तसेच देशभरातून एकूण 450 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. (Latest Marathi News)

Riya PAtil
IND vs NZ : टीम इंडियाचा मालिकेवर 1-0 ने कब्जा, पावसामुळे तिसरा सामना रद्द

या स्पर्धेत सब ज्युनिअर गर्ल्समध्ये कोल्हापूरच्या रिया सचिन पाटील हिने सुवर्ण कामगिरी केली. रिया पाटील ही या स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू होती. तिने 100 मीटर फ्री स्टाईलमध्ये 4 मिनीटे 12 सेकंदाची कामगिरी नोंदवली. तर 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये 1 मिनिटे 57 सेकंदाची कामगिरी नोंदवली.

महाराष्ट्राचा ऑलिम्पिक खेळाडू सुयश जाधव तसेच स्वप्निल पाटील, दीपक पाटील यांनी या स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केली. मुलींमध्ये कांचन चौधरी, वैष्णवी जगताप, शश्रुती नाकाडे, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, तृप्ती, नाशिकच्या सिद्धी आणि गौरी यांनी सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली.

Riya PAtil
FIFA World Cup 2022: ईरानी खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास नकार; हिजाबचा विरोध केल्यानं स्वदेशी परतल्यावर मिळणार मोठी शिक्षा?

पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. रिया सचिन पाटील हिला उत्कृष्ट खेळाडूची ट्रॉफी देण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com