IPL: चेन्नईचे भविष्य उज्वल, सेहवागने सांगितला MS Dhoni चा उत्तराधिकारी

सेहवागला वाटते की चेन्नईचा कर्णधार म्हणून....
MS Dhoni
MS Dhoni Saam TV

भारताचा माजी सलामवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) चेन्नई सुपर किंग्सच्या (Chennai Supar Kings) संघाचा एमएस धोनीनंतर (MS Dhoni) उत्तराधिकारी म्हणून ऋतुराज गायकवाडच्या नावाला पसंती दिली आहे. विरेंद्र सेहवागचे म्हणणे आहे की एक गुण सोडला तर एमएस धोनी आणि ऋतुराज गायकवाडमध्ये सर्व साम्य आहे. एमएस धोनी आपल्या नेतृत्व करण्याच्या शैलीने एक महान खेळाडू आणि कर्णधार आहे, परंतु अनेकदा त्याचे नशिबही त्याच्या सोबत असते. सेहवागला वाटते की चेन्नईचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडचे नशिब धोनीसारखे नाही.

MS Dhoni
रोहित शर्माची नजर विश्वविक्रमावर, आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यावर ठाम!

सेहवागने क्रिकबझशी संवाद साधताना सांगितले की, “एखाद्याचा हंगाम चांगला जाऊ शकतो, परंतु जर रुतुराज गायकवाड आणखी 3-4 सीझन खेळला तर तो एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार बनू शकतो. एमएस धोनीला बाकीचे चांगला कर्णधार का मानतात? कारण तो कूल आहे. तो स्वत:चे निर्णय स्वत: घेतो आणि त्याच्या गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा चांगला वापर कसा करायचा हे त्याला माहीत आहे. धोनीसोबत नशिबही आहे. पण नशीबही शूर असलेल्यांना साथ देते आणि एमएस धोनी एक धाडसी कर्णधार आहे. गायकवाडकडे नशिबाशिवाय कर्णधारपदाचे सर्व गुण आहेत.

दरम्यान सध्या आयपीएलमधून चेन्नईचा संघ बाहेर पडला आहे. मुंबईनंतर चेन्नई हा दुसरा संघ आहे जो प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऋतुराज गायकवाडने या हंगामात आपल्या फलंदाजीतून विशेष काही कामगिरी केली नाहीये. ऋतुराजने 13 सामन्यात 313 धावा केल्या आहेत. एमएस धोनी अजून किती हंगामा आयपीएल खेळणार हे कोणालाच माहिती नाही. परंतु धोनीनंतर संघाची कमान कोणात्या खांद्यावर टाकली जाते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com