

भारतातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू मिताली राज, नेटवर्थ 40–45 कोटी
तिच्यानंतर स्मृती मंधाना (32–34 कोटी) आणि हरमनप्रीत कौर (25 कोटी)
या तिघीही क्रिकेटसोबत ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून मोठी कमाई
भारताच्या लेकींनी जगात नाव उंचावलं आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला धूळ चारत विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या महिला खेळाडूचं सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर आता खेळाडूंच्या श्रीमंतीची चर्चा सुरु झाली आहे. भारताच्या महिला संघात तीन खेळाडू सर्वात श्रीमंत आहेत. जाणून घ्या.
मिताली राज
मिताली राजचा जन्म हा राजस्थानच्या जोधपूरमध्ये ३ डिसेंबर १९८२ रोजी झाला. मिताली राज ही शिस्तप्रिय तामिळ कुटुंबातील आहेत. तिचे वडील दोराई राज हे एअर इंडिया फोर्समध्ये वॉरंट ऑफीसर होते. आई लीला राज यांनी मितालीला स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. मितालीने १० वर्षांची असताना मोठ्या भावासोबत क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मितालीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. आंतराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे. तसेच मिताली राज ही सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू आहे. तिची एकूण नेटवर्थ ४०-४५ कोटी रुपये इतकी आहे. मिताली राज अनेक ब्रँडचा प्रचार करून पैशांची कमाई करते. क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर ती प्रशिक्षक म्हणूनही काम करते.
२९ वर्षीय स्मृती मंधाना ही स्टार क्रिकेटपटू आहे. तिची नेट वर्थ ३२-३४ कोटी रुपये इतकी आहे. ती क्रिकेट, ब्रँड प्रमोशन आणि व्यवसायातून कमाई करते . बीसीसीआयसोबत झालेल्या ए ग्रेड करारातून वर्षाला ५० लाख रुपयांची कमाई करते. तर आयपीएलमधून ३.४ कोटी रुपयांची करते. ती आयपीएलमध्ये आरसीबी संघाची कर्णधार देखील आहे. तर मैदानाबाहेर ह्युंदाई, नाईक आणि रेड बूल यांसारख्या ब्रँडचे प्रमोशन करून ५०-७५ लाखांची कमाई करत असते. सांगलीत स्मृती मंधानाचे घर आहे. तिच्या घरात सर्व सुख सुविधा आहेत. तसेच SM-18 नावाने स्पोर्ट्स कॅफे देखील चालवते.
३६ वर्षीय हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. तिच्या कामगिरीचं देशभरात कौतुक होत आहे. तिचं नेट वर्थ २५ कोटी रुपये इतके आहे. तिला ए ग्रेड करारानुसार बीसीसीआयकडून वर्षाला ५० लाख रुपये मिळतात. ती पंजाबमध्ये उपअधीक्षक म्हणूनही कार्यरत आहे. ब्रँड प्रमोशनमधून वार्षिक ५० लाखापर्यंत कमाई करते. तिचं पंजाब आणि मुंबईत घर आहे. तिच्याकडे महागड्या गाड्या आहेत. तिला दुचाकी चालवायला आवडतं. तिच्याकडे अनेक महागड्या दुचाकी देखील आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.