RCB vs PBKS : विराट कोहलीचं शतक हुकलं; बेंगळुरूचा पंजाबसमोर २४२ धावांचा डोंगर

RCB vs PBKS/IPL2024 : धर्मशाला येथे होत असलेल्या आयपीएलच्या आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यात आरसीबीनने पंजाबसमोर २४२ धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. यात विराट कोहलीचं मोठं योगदान राहिलं. अवघ्या ८ धावांनी विराटचं शतक हुकलं.
RCB vs PBKS
RCB vs PBKSSaam Digital

धर्मशाला येथे होत असलेल्या आयपीएलच्या आरसीबी आणि पंजाबमधील सामन्यात आरसीबीनने पंजाबसमोर २४२ धावांचं तगडं आव्हान ठेवलं आहे. यात विराट कोहलीचं मोठं योगदान राहिलं. अवघ्या ८ धावांनी विराटचं शतक हुकलं.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीने ४७ चेंडूत षटकार चौकार ठोकत सर्वाधिक ९२ धावा केल्या. रजत पाटीदारने २३ चेंडूत ५५ धावांचे मोठं योगदान दिलं. त्याने ३ चौकार आणि ६ षटकार ठोकले. तर कॅमेरून ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन केलं. त्यांनी ७ चेंडूत ४६ धावा केल्या. त्यात चौकार आणि १ षटकार लगावला.

RCB vs PBKS
PBKS vs RCB Pitch Report: पंजाब की बंगळुरु? कोण पडणार स्पर्धेतून बाहेर? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड अन् पिच रिपोर्ट

 ७ चेंडूत १८ धावा करून दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला, त्याचा हर्षल पटेल ने बाद केलं. पंजाब किग्जकडून हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने ४ षटकांत ३८ धावांत ३ फलंदाजांना तंबूत धाडलं. विदवथा कावेरप्पाने २ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केले.

RCB vs PBKS
PBKS vs RCB Playing 11 Prediction: 'करो या मरो' लढतीत शिखर धवन परतणार? पाहा दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ११

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com