RCB vs LSG,IPL 2024: RCB ने जिंकला टॉस! LSG ला फलंदाजीचं आमंत्रण; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे
rcb vs lsg
RCB vs LSG IPL 2024 match details royal challengers bangalore vs lucknow super giants toss update playing 11 amd2000twitter

RCB vs LSG ,Playing 11 And Toss Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १५ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नस्वामीच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकला असून लखनऊ सुपरजायंट्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. तर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुचा संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसून येणार आहे.

लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाला राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने शानदार विजय मिळवला होता. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाला ३ पैकी केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. (Cricket news in marathi)

rcb vs lsg
RCB vs LSG, IPL 2024: बंगळुरु- लखनऊ येणार आमने-सामने! केएल राहुल खेळणार का? पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टीरक्षक), रिस टॉपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

लखनऊ सुपर जाएंट्स: क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, यश ठाकुर, नवीन उल हक, मयंक यादव.

rcb vs lsg
Mumbai Indians, IPL 2024: मुंबई इंडियन्समध्ये खरंच २ गट पडलेत का? पराभवानंतर संघातील खेळाडूने केलं उघड

असे आहेत दोन्ही संघ:

लखनऊ सुपरजायंट्स संघ- क्विंटन डिकॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बदोनी, क्रुणाल पांड्या, रवि बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, नवीन उल हक , अमित मिश्रा, कायेल मेयर्स, एश्टन टर्नर, कृष्णप्पा गौतम, मॅट हेनरी, दीपक हुड्डा, प्रेरक मांकड, यश ठाकुर, शिवम मावी, युद्धवीर सिंग चरक, अरशद खान, शामार जोसेफ, अर्शिन कुलकर्णी.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु- विराट कोहली, फाफ डुप्लेसिस (कर्णधार), कॅमरन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत (यष्टीरक्षक), अल्जारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल, विजयकुमार विश्याक, दिनेश कार्तिक, कर्ण शर्मा , रिस टॉप्ले, टॉम करन, स्वप्निल सिंग, लॉकी फर्ग्यूसन, महिपाल लोमरोर, विल जॅक्स, सुयश प्रभुदेसाई, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशु शर्मा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com