मोहाली (Mohali Test) येथे भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात श्रीलंकेच्या फलंदाजांनी केली. श्रीलंकेकडून पथुम निसांका आणि चरिथ अस्लांका फलंदाजीला आले. मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (R. Ashwin Record) न्यूझीलंडचा महान खेळाडू सर रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडला आहे. तसेच तिसऱ्या दिवशी अश्विनने भारताचे दिग्गज गोलंदाज कपिल देव यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
शनिवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेने 4 गडी गमावून 108 धावा केल्या होत्या. भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या. यासह अश्विनने आता कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने न्यूझीलंडचा महान क्रिकेटपटू रिचर्ड हॅडली (431) यांना मागे टाकले आहे. यानंतर तिसऱ्या दिवशी अश्विनने पथुम निसांकाच्या विकेटसह भारताचा माजी कर्णधार कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली. कपिल देव यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट घेतल्या आहेत. आर अश्विनने आज पथुम निसांकाची विकेट घेत कारकिर्दीतील ४३४ वी विकेट पूर्ण केली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अश्विनने कपिल देवसह 9वे स्थान राखले आहे. मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 800 विकेट्स आहेत. मोहाली येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस असून 574 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने श्रीलंकेचा पहिला डाव 174 धावांवर आटोपला. त्यानंतर टीम इंडियाने श्रीलंकेला फॉलोऑन दिला आणि श्रिलंकेने 130 धावांत 7 विकेट गमावल्या आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.