IPL 2022 : 'CSK'चा उडवला धुव्वा; 'मी तर अष्टपैलू खेळाडू आहे', राशिद खान म्हणाला...

Rashid Khan
Rashid Khangoogle

मुंबई : रविवारी पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये (Pune mca stadium) झालेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai super king) आणि गुजरात टायटन्स (Gujrat titans) आयपीएलच्या सामन्यात गुजरातने चेन्नईचा धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकत गुजरात टायटन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने दमदार फलंदाजी करत ५ बाद १६९ धावांचं आव्हान गुजरात टायटन्ससमोर ठेवलं. गुजरातनेही चेन्नईच्या गोलंदाजांवर चौफेर फटकेबाजी करत ७ विकेट्स गमावत १७० धावांचं लक्ष्य गाठून (csk lost match) चेन्नईचा पराभव केला. गुजरातने ३ विकेट्स राखून हा सामना जिंकला. दरम्यान, गुजरात टायटन्सने आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये पाच सामने जिंकून गुणतालिकेवर टॉपचं स्थान गाठलं आहे.

Rashid Khan
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचे सावट; पुण्याचा दौरा केला रद्द

राशिद खान म्हणाला...

चेन्नई आणि गुजरातमध्ये झालेल्या या सामन्यात कर्णधारपदाची सुत्रं अफगानिस्थानचा अष्टपैलू खेळाडू राशिद खानकडे सोपवली होती. हार्दीक पांड्याच्या अनुपस्थितीत राशिदच्या नेतृत्वात गुजरातच्या टीमनं अप्रतिम कामगिरी केली. विशेष म्हणजे राशिद खानने २१ चेंडूत ४० धावा कुटल्याने गुजरातच्या टीमला चेन्नईवर विजय मिळवणं सहज शक्य झालं. त्यानंतर सामना संपल्यावर राशिद म्हणाला, 'मी अष्टपैलू खेळाडू आहे आणि सामना जिंकवू शकतो'.

माझ्यावर जबाबदारी होती: राशिद खान

राशिद खान त्याच्या फलंदाजीबाबत बोलताना म्हणाला मी मागील पाच सामन्यात फलंदाजी केली नव्हती. यावर मी टीमसोबत चर्चा केली. त्यानंतर माझ्यावर जबाबदारी होती. टीमच्या दोन फलंदाजांकडून मोठ्या धावांची आम्हाला अपेक्षा होती. त्यानंतर मी डेविड मिलरची चर्चा केली आणि आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. टीमला जिंकवण्यासाठी जबाबदारीनं खेळणं हीच आमची रणनीती होती.

चेन्नईचा गुजरातने ३ विकेट्सनं केला पराभव

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत चेन्नईने ५ बाद १६९ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने ४८ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. अंबाती रायडूने ३१ चेंडूत ४६ धावा कुटल्या. त्यानंतर १७० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी गुजरातच्या फलंदाजांनी आक्रमक खेळी केली. विशेष म्हणजे डेव्हीड मिलरने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या. कर्णधार राशिद खानने २१ चेंडूत ४० धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com