IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचे सावट; पुण्याचा दौरा केला रद्द

आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर कोरोनाचे सावट पसरले आहे
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचे सावट; पुण्याचा दौरा केला रद्द
IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचे सावट; पुण्याचा दौरा केला रद्द- Saam Tv

नवी दिल्ली : आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या संघावर कोरोनाचे सावट पसरले असून सर्व खेळाडूंना सक्तीच्या विलिगीकरणात जाण्यास सांगितले आहे. त्यामुळे या संघाने आता आपला पुणे (Pune) दौरा रद्द केला आहे. (IPL 2022 Delhi Capitals Cancels Pune Tour due to Corona)

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहात यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. संघाच्या आणखी एका खेळाडूलाही कोरोनाची लागण झाल्याचे रॅपिड अँटिजेन चाचणीत समोर आले आहे. त्यामुळे आता सर्व संघाची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस या खेळाडूंची कोविड चाचणी करण्यात येणार आहे.

IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सवर कोरोनाचे सावट; पुण्याचा दौरा केला रद्द
IPL 2022: मुंबई इंडियन्सचे सलग सहा पराभव रोहित शर्मा म्हणाला...

आता या सर्व खेळाडूंना विलिगीकरणात ठेवण्यात आले आहे. येत्या बुधवारी (ता. २० एप्रील) आयपीएल (IPL 2022) स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचा सामना पंजाब किंग्ज बरोबर होणार होता. पण आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने आपला पुणे दौराच रद्द करण्यात आल्याने हा सामना रद्द होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या सामन्याला मुकाले लागणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com