Ranji Trophy, Prithvi Shaw Wicket: पृथ्वीला 440 व्होल्टचा धक्का! यश ठाकूरच्या मॅजिकल बॉलवर पडली विकेट- VIDEO

Prithvi Shaw Wicket: रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना मुंबई विरुद्ध विदर्भ या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे.
ranji trophy 2024 final prithvi shaw clean bowled by yash thakur in final video went viral
ranji trophy 2024 final prithvi shaw clean bowled by yash thakur in final video went viral twitter
Published On

Prithvi Shaw Wicket On Yash Thakur Bowling:

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील फायनलचा सामना मुंबई विरुद्ध विदर्भ या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात सध्या मुंबईचा संघ ड्राईव्हींग सीटवर आहे. विदर्भ संघाचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांवर आटोपला. घरच्या मैदानावर गोलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली आहे.

मुंबईकडून गोलंदाजी करताना धवल कुलकर्णी, शम्स मुलानी आणि तनुषा कोटीयानने शानदार गोलंदाजी करत प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. मुंबईने पहिल्या डावात २२४ धावा केल्या होत्या. तर मुंबईकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पृथ्वी शॉ ११ धावांवर क्लिन बोल्ड केलं. त्याला मॅजिकल चेंडूवर क्लिन बोल्ड केल्याचा व्हिडिोओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ranji trophy 2024 final prithvi shaw clean bowled by yash thakur in final video went viral
WPL 2024: नशीबच फुटकं ना राव! १ चेंडू, २ धावांची गरज अन् RCB चा पराभव; अंतिम षटकात काय घडलं?

पृथ्वी शॉ बाद झाल्याचा व्हिडिओ बीसीसीआय डॉमिस्टिकच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात यश ठाकूरने मॅजिकल चेंडू टाकून त्याला बाद केलं आहे. ज्यावेळी तो बाद झाला त्यावेळी त्याला विश्वास बसत नव्हता. त्याच्या रिअॅक्शनचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या सामन्याची स्थिती पाहता मुंबईला विजयाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. (Cricket news in marathi)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, विदर्भ संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून प्रथम फलंदाजी करताना शार्दुल ठाकुरने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने ४६ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव २२४ धावांवर संपुष्टात आला. या धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा डाव १०५ धावांवर संपुष्टात आला. मुंबईने दुसऱ्या डावात मोठी आघाडी घेत २ गडी बाद १०६ धावा केल्या आहेत.

ranji trophy 2024 final prithvi shaw clean bowled by yash thakur in final video went viral
IND vs ENG 5th Test: सरफराज ते जुरेल! कशी राहिली इंग्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या पाचही खेळाडूंची कामगिरी ? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com